महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.32
महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.32
गणिती काटेकोरपणा असतो ते त्यांना ठाऊक होते. म्हणून साहजिकच त्यांना या शास्त्रातील दाखला सुचला अनंत अवकाशात असंख्य तारे व ग्रहगोल वर्षानुवर्षे किती सुनियंत्रितपणे आपापल्या कक्षेत फिरत आहेत हे पाहिले म्हणजे नवल वाटते. त्याबरोबरच सृष्टीकर्त्याच्या सर्वज्ञतेचा, कल्पकतेचा, सामर्थ्याचा, ऐश्वर्याचा, औदार्याचा व कल्याणकारकतेचा प्रत्यय येतो. सृष्टिव्यापाराचे जे नियम आहेत त्यांचा जनक ईश्वर आहे. विश्वातील हरएक लहानमोठ्या दृश्यांचे अवलोकन केले, म्हणजे त्याच्या घडणीमागील ईश्वराचा हात जाणवल्याखेरीज राहात नाही. विश्वातील यच्चयावत घडामोडींचे नियम शोधून काढण्याचा विज्ञानाचा प्रयत्न असतो. या नियमांच्या द्वारा ईश्वरी योजनेचा व इच्छेचा मागोवा घेता येतो. धर्मजीवनाच्या परिपूर्तीसाठी ईश्वरनिष्ठा आणि नैतिक सत्याचे अनुसरण या दोन गोष्टी आवश्यक आहेत. त्यासाठी तथाकथित दैवी साक्षात्कारातून सिद्ध झालेल्या धर्मग्रंथांची गरज आहे का? नाही. मुळीच नाही. ईश्वराचे स्वरूप, गुण आणि शक्ती यांचे पूर्ण ज्ञान माणसाला कधीच होऊ शकणार नाही. परंतु त्याला आत्मकल्याणासाठी जेवढे ज्ञान जरुर आहे, तेवढे त्याला सृष्टिविषयक चिंतनातून मिळवता येते; आणि त्यातून त्याची ईश्वरावरची श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जाते. नैतिकतेचे उगमस्थान तर प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीतच आहे. म्हणून ज्यांना विशुद्ध धर्मसाधनेची खरी आच असेल, त्यांना कोणत्याही सांप्रदायिक प्रमाणग्रंथाची किंवा पंथविशिष्ट उपासना पद्धतीची कास धरण्याचे यत्किंचितही कारण नाही.
मानवता धर्माचा सामाजिक आशय मानवी समतेचे तत्त्वही पेन यांना त्यांच्या धर्मचिंतनातून स्फुरले; आणि त्यांच्या धर्मविचाराचे ते एक शक्तिकेंद्र बनले. वायवलमधील अनेक भ्रामक कल्पनांचे आणि निराधार कहाण्यांचे जरी त्यांनी वाभाडे काढले होते, तरी येशू खिस्ताच्या नैतिक शुद्धतेबद्दल आणि सत्वसंपन्नतेबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. सांप्रदायिकतेचे स्तोम कमी करून खिस्ताच्या मूळ मानवतावादी तत्त्वप्रणालीशी आपण जास्तीत जास्त इमान राखले आहे असा पेन यांचा दावा होता. समता आणि बंधुभाव या तत्त्वांचा येशू ख्रिस्तानेही आग्रह धरला होता. सर्व माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत. त्यांचे जीवनसत्व एकच आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01