शरणगाथा क्रमशा.32
शरणगाथा क्रमशा.32
वचनातून चोख उत्तर दिले आहे. ते म्हणतात, पहाटे उठून डोळे चोळीत माझ्या उदरपोषणार्थ, संपत्ती संपादनार्थ, माझ्या कांता संतानांप्रीत्यर्थ तळमळलो असेन तर, माझ्या मनास मनच साक्षी ! आसने शयने याने सम्पर्क सहभोजने। संचरंति महाघोरे नरके कालमक्षयम् ।। हे श्रुतिवाक्य बसवण्णा जाणतो, तरीही, भवी बिजळाच्या सिंहासनतळी बसून त्यास तोषवितो’ असे प्रमथ बोलतात. यावर त्यांना काय उत्तर देऊ? कसे उत्तर देऊ? प्रसंगी अंत्यजांच्या घरी जाऊन नोकरी करेन, परंतु, केवळ तुजकारणे कष्ट न झेलता स्वतःचे देहपोषण नि रक्षणासाठी कष्टलो, तर होऊ द्या शिरच्छेद, कुडलसंगमदेवा. (समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ७१०)
‘अन्य कोणी विश्वास ठेवो वा न ठेवो, सकाळी उठल्यापासून रात्री निद्रा घेईपर्यंत मी सतत चिंतन-मनन करतो, श्रमतो, कष्टतो, ते केवळ विशुद्ध शिवपर भावनेने, समत्त्व बुद्धीने, मानव समाजाचे कल्याण साधण्याकारणेच ! सकल जीवात्म्यांचे हितचिंतन करीतच नित्य कायकनीरत होतो. उदरपोषणाच्या चिंतेने, विपुल संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने, माझ्या बायका-मुलांच्या ऐहिक सुखसोयीं-प्रीत्यर्थ तळमळत स्वाथ्य भावनेने मी कोणाची चाकरी करीत नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी राजा आणि रंक असा भेद करून मी कोणाची चाकरी पत्करलेली नाही, यास माझे अंतःकरण साक्षी आहे. तरीही संधिसाधू होऊन मी भवी बिजळाची चाकरी करीत त्याला तोषवितो, असा आक्षेप घेणाऱ्यांना काय उत्तर द्यावे ? कौटुंबिक संसाराचा गाडा चालविण्यासाठी नव्हे, तर शिवकार्यासाठीच आज बिजळ राजाच्या दरबारात मंत्री होऊन राज्याचे भांडार सांभाळण्याचे सत्य- शुद्ध कायक सचोटीने पार पाडतो. उद्या प्रसंगी अंत्यजांच्या घरीसुद्धा मोलमजुरीचे मंगल कायक करेन; तेही केवळ दासोहाद्वारे शिवकार्य पार पाडण्यासाठीच !
स्वतःचे पोषण आणि कुटुंबाचे रक्षण करण्याच्या स्वार्थहेतू सिद्धीसाठी नव्हे ! शिवभावान समाजाच्या कल्याणासाठी कायकात हा देह न झिजविता मनात स्वार्थभावनेचा लवलेश जरी आढळला, तरी माझा शिरच्छेद होऊ द्या, अशा शब्दांत बसवण्णा शब्द प्रामाण्यवादी सांप्रदायिकांच्या आक्षेपास समर्पक उत्तर देतात. त्याद्वारे मानवतावादी वैश्विक दृष्टी व
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01