सोशल

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.11

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.11

पाठिंचा होता. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ते या स्वातंत्र्य आंदोलनाला मदत करीत असत. म्हणून आपला देश स्वतंत्र झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी जमलेल्यांना सांगितली. साधू संत शक्यतोवर राजकीय विषयावाचत बोलत नाहीत. भगवानबाबा त्याला अपवाद आहेत. म्हणून तर ते आगळे-वेगळे संत आहेत.” हे सिद्ध होते. १.७.२ दुःखी-वेदनादायी प्रसंग :

संत भगवानबाबांचे अखंड आयुष्य हे वेदनादायी प्रसंगाचे आगार आहे. ही गोष्ट आपल्याला त्यांचे जीवनकार्य अभ्यासताना लक्षात येते. जन्मानंतर चार-दोन वर्षानंतर मिळालेले चार वर्षाचे शिक्षण. आपले शहरात कोणी नातेवाईक नाही व तेथील खर्चही आपल्याला झेपणार नाही. अशी आई-वडिलांची झालेली अवस्था. त्यामुळे आवड असूनही शिक्षण घेता येत नसल्याने व्यथीत झालेला आबा हे दुःख पचवतो व घरच्यांच्या सांगण्यावरून जनावरे सांभाळण्याचे काम करतो. पुढे हे करत असताना अंगभूत असलेल्या विठ्ठल भक्तीच्या गोडीने व ओढीने कासावीस झालेल्या मनाला समज घालण्यासाठी घरच्यांचा विरोध पत्कारून त्यांना न सांगताच पंढरपूरची वारी करतो. विठ्ठल भक्तीची गोडी व गुरू दीक्षेसाठी तळमळ असलेल्या आबाजीला नारायणगडावर सोडल्या जाते. ताई- वडील, भाऊ, सवंगडी, गावकरी यांच्याशी कायमची ताटातूट झाली. ती आठवण आबाजीला व्याकूळ बनवत राहते. पुढे गुरूंकडून गुरू दीक्षेसाठी पाहिल्या जाणाऱ्या परीक्षा त्यात भर करत राहतात. नंतरच्या काळात काही काळ विद्याअभ्यासात जातो न जातो तर आईचे निधन झाल्याचे समजते. आपण साधूपणाचा स्वीकार लोककल्याणासाठी, परोपकारासाठी केल्याची जाणीव ठेवून आता आपलं स्वतःच असं कुणीच नाही, ही भावना ठेवून स्वतःच्या आईच्या अंत्यविधीला न जाता आपले नियत कार्य मोठ्या जड अंतःकरणाने करणारे भगवानबाबा एक वेगळेच रसायन असल्याचे लक्षात येते.

आळंदी येथे बंकटस्वांर्मीडे आध्यात्मिक शिक्षण घेत असताना आपण कमी शिक्षण घेतल्याची सारखी बोचत राहणारी खंत. नारायणगडावर शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर माणिकबाबांच्या मार्गदर्शन व पाठिंब्यावर कीर्तनाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य. उपेक्षित, वंचित जीवन जगण्याच्या प्रवाहातून भरकटलेल्या व निजामी पाशवी प्रवृत्तीने भयभीत झालेल्यांना सन्मार्ग दाखवण्याचे काम चालू असतानाच त्यांच्यावर स्त्रीविषयक आरोप झाल्याने पूर्ण आयुष्यच कोलमडून पडल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. जी गोष्ट साधी-सोपी नव्हती. कारण आपण ज्या लोकांना सन्मार्ग दाखवतो तेच लोक असे आरोप

करताना पाहावत नाही व या गोष्टीला उत्तर म्हणून आपले संतत्व व ब्रह्मचर्यावरील कलंक पुसून टाकावा व पुन्हा आपल्यावर भविष्यात कधीच असा आरोप होऊ नये म्हणून, स्वतःच्या हाताने स्वतःचे लिंगछेदन करतात. त्यातून सावरतात न सावरतात तोच गुरू माणिकबाबांचे निधन होते. त्यातून सावरून नारायणगडाची जबाबदारी सांभाळत असताना, लोकप्रबोधन, शिक्षण, गडाचा विकास आदी गोष्टीबरोबर हैद्राबाद मुक्तिलढा यासारख्या गोष्टींना गती देण्याचे काम चालू असते. त्यातच वडिलांचे निधन झाल्याचे समजते. अशात नारायणगड वारसाहक्क उफाळून वर येतो व आपल्या आयुष्यातील ४० वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ खर्च करून उभे केलेल्या वैभवाचा त्याग केला जातो आणि भावी आयुष्य अंधःकारमय होते. जीवन जगण्याचा विट येतो. मनाचा निग्रह करून हिमालयात जाण्याचा विचार येतो; पण लोकमान्यता मिळालेली असल्यामुळे ती पाठ सोडत नव्हती. लोकागृहास्तव भगवानगड उभा राहतो न राहतो तोच शरीर साथ देईनासे होते. काही व्याधी जडतात व त्यातच त्यांचा अंत होतो.

१.७.३ त्याग :

संताच्या आयुष्यात त्यागाला फार मोलाचे स्थान असते. ज्याच्या अंगी त्यागाची भावना असेल तोच संत पदाला पोहोचतो. असेही संतांच्या बाबतीत म्हणता येईल. त्याग करण्यासाठी विशाल हृदय लागते आणि ते विशाल हृदय संताजवळ असते. असे आपल्याला संतांची चरित्रे पाहिल्यानंतर लक्षात येते. संत भगवानबाबाही या त्यागी संतांच्या परंपरेत येतात. रघुवंशातील सत्यवान राजा हरिश्चंद्राची कथा आपल्याला माहीत आहे. त्यांनी स्वप्नात विश्वमित्रऋषर्षीना सर्वस्व दान केले होते. आयुष्यातील सर्व कर्माचे भोग भोगून झाल्यानंतर दंडकारण्यात वानप्रस्थ आश्रम कंठवत असताना स्वयंभू महादेवाचे स्थान निर्माण केले व तपश्चर्या करू लागले अशी अख्यायिका सांगितल्या जाते. कालांतराने त्याच हरिश्चंद्राने स्थापन केलेल्या मंदिराभोवती वसती निर्माण होऊन हरिश्चंद्रपिंप्री गाव वसले गेले. ज्या मंदिराचे प्रमुखपद भगवानबाबांकडे आले होते. अगदी राजा हरिश्चंद्राप्रमाणे भगवानबाबांच्या आयुष्यात काही प्रसंग घडले. त्यांनी कशाचाही विचार न करता अंगावरील वस्त्रानिशी सर्वस्वाचा त्याग केला. म्हणजे नारायणगडाच्या प्रमुखपदाचा- राजऐश्वर्याचा त्याग केला. कुठल्याही मोहात न अडकता समाजा-समाजात तेढ निर्माण होऊन साध्य ते काय होणार? यापेक्षा या ऐश्वर्याचाच त्याग केलेला बरा. ज्यामुळे आपापसात बंधुभाव कायम राहून समाजस्वास्थ्यअबाधित
राहील.

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button