सोलापूर

चरणगाथा क्रमशा.39

चरणगाथा क्रमशा.39

 

नाही, याचा त्यांना गर्व होता. याच गर्वातून गोरक्षनाथांनी अल्लमप्रभूना हिणविण्याचा प्रयत्न केला. परिणामी अल्लमप्रभूनी गोरक्षनाथास आपल्या व्योमकाया स्वरूपाचे दर्शन घडविले. गोरक्षनाथांच्या शरीरावर शस्त्र चालत नसतील तर अल्लमांच्या शरीरातून आरपार तलवार गेली. हवेतल्या हवेत वार करावेत आणि शरीराला काहीच होऊ नये हे चित्र पाहून गोरक्ष प्रभुदेवांना शरण आले. आपण देह कितीही कठीण बनवले तरीही एक ना एक दिवस शरीराचा त्याग करावाच लागणार आहे. मग या नाशवंत शरीरासाठी आयुष्यभर परिश्रम घेण्यात कसली आलीय साधना, या अल्लमप्रभुदेवांच्या प्रश्नाचे गोरक्षनाथांकडे उत्तर नव्हते.

शरीराच्या मर्यादा हा विषय अल्लमांच्या चिंतनाचा आहे. काम-क्रोधादी सहा अवगुण शरणांच्या अधीन असतात, असायला हवेत, याकडे प्रभुदेवांनी लक्ष वेधले आहे.

कामवासनेमुळे सत्याचा ऱ्हास होतो,

क्रोधामुळे ज्ञानाचा ऱ्हास होतो, लोभामुळे धर्माचा ऱ्हास होतो, मोहामुळे वीरक्तीचा ऱ्हास होतो, अहंकारामुळे भक्तीचा -हास होतो

आणि मत्सरामुळे मुक्तीचा -हास होतो गुहेश्वरा

षड्रिपूंना आपल्या अंकीत ठेवणारा खरा शरण पाहा.

(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक १०७५)

प्रभुदेवांनी स्थावर संपत्तीपेक्षा ज्ञानाला ज्ञानसाधनेला सर्वश्रेष्ठ मानले आहे. ना कोणत्याही स्वरुपातील मालमत्तेपेक्षा, संपत्ती आभूषणांपेक्षा, ज्ञानाला मोठा अलंकार बने मानले आहे.

जमीन तुझी नाही, संपत्ती तुझी नाही, हं स्त्री-कामिनी तुझी नाही, ज्ञान हेच तुझे आभूषण पाहा,

नी

या ज्ञानरत्नांनी तू अलंकृत झाल्यास

तुझ्या इतका श्रीमंत पृथ्वीवर

गुहेश्वरांच्या साक्षीने कोणीही नाही रे मना

(समग्र वचन संपुट-२ : वचन क्रमांक १४२९) अशा रीतीने ज्ञानी हाच या विश्वातील श्रेष्ठ व्यक्ती असल्याचे प्रभुदेव म्हणतात.

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button