महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 39

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 39
त्यांनी अखेरपर्यंत अशा कमकुवतपणाला थारा दिला नाही. शिवाय एकदा कोणताच धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत नाही, मनुष्याच्या मनात जे सद्विचार व सदासना उत्पन्न होतात ती मात्र ईश्वरी प्रेरणा होय असे म्हणायचे आणि पुन्हा माझ्या या प्रतिपादनात माझ्या पदरचा एक शब्ददेखील नाही; वेद, शास्त्र, पुराणे यांचे विवेचन करून पाहिले असता हाच त्यांचा मुख्य सिद्धांत होय असे सांगायचे ही दादोबांच्या प्रतिपादनातील विसंगती आणि तिच्या मुळाशी असलेले मनाचे दुभंगलेपण या गोष्टी जोतीरावांना खटकल्याखेरीज राहिल्या नसतील. परमहंस मंडळीच्या सभासदांच्या दृष्टीपुढे सामान्यतः शहरी पांढरपेशा वर्ग होता. खेड्यांपाड्यांतील कष्टकरी लोकांच्या धर्मजीवनाचा त्यांनी कधी विचारच केला नाही. मग त्यात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा त्यांना कुठून होणार? जोतीरावांना तर या लोकांच्याच भवितव्याची चिंता होती. म्हणून कालांतराने जोतीरावांना वेगळा मार्ग शोधावा लागला. परमहंस मंडळीचे अनुयायी प्रार्थना समाजात गेले. जोतीरावांनी सत्यशोधक समाज स्थापला. जीवितकार्याचा शोध
जोतीरावांनी इ.स. १८४८ मध्ये सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. तेव्हा त्यांना प्रथम आपण स्त्रियांच्या व अतिशूद्रांच्या शिक्षणाचे कार्य हाती घ्यावे असे वाटले. त्यापूर्वी २०-२५ वर्षे तरी महाराष्ट्रात खिस्ती धर्मोपदेशकांचे शिक्षणप्रसाराचे कार्य चालू होते. त्यांच्याशी आपले अनेक बाबतीत मतभेद असले, तरीदेखील त्यांच्या योजनाबद्ध कार्यपद्धतीचे नीट निरीक्षण करून मगच आपण प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करावी असा विचार त्यांना सुचला. आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर ते अहमदनगरला गेले; आणि तेथील फारार मडमेच्या कन्याशाळा त्यांनी पाहिल्या. पुण्यास परत आल्यावर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी एक शाळा काढली. मुलींच्या शिक्षणाला आपल्या धर्माची अनुज्ञा नाही अशी जुन्या शास्त्रीपंडितांची समजूत होती. त्यात पुन्हा शाळेत जाणाऱ्या मुली अंत्यजांच्या. तेव्हा या उपक्रमाला सनातनी लोकांनी जोरदार विरोध केला असला तर नवल नाही. अशा स्थितीत शाळेत नुसते पुरुष शिक्षक असले, तर अडचणीत आणखीच भर पडणार. त्यादृष्टीने अध्यापनासाठी एखादी शिक्षिका मिळाली तर बरे. म्हणून जोतीरांवांनी आपल्या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




