सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.. 137
सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.. 137
बेलोरा येथे एक प्रशस्त वाडाही बांधला होता. बेलोरा येथील यशवंतराव देशमुख अध्यक्ष असलेल्या बेलोरा सत्यशोधक शाखेचे ते सचिव होते. पुढे इ. स. १९०२ मध्ये ते वऱ्हाड प्रांत सत्यशोधक समाजाचे सचिव होते. १९०२च्या सुमारास ओतूरकर सत्यशोधक शास्त्री महाधट आणि शास्त्री धर्माजी रामजी डुंबरे यांचे बेलोरा येथे वास्तव्य होते. शास्त्री महाधट आणि शास्त्री डुंबरे यांची सत्यशोधक विवाहमताची ‘पूजापद्धती भाग-२’ पॉकेट सिरीज आकाराची ४७ पृष्ठांची एक पुस्तिका बडोदा येथील बडोदावत्सल छापखान्यातून प्रसिद्ध झाली. या सत्यशोधक पुस्तिकेला राजाराम डवरे यांची दीड पानी प्रस्तावना लाभली आहे.
दरम्यान, शास्त्री महाधट आणि शास्त्री डुंबरे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सत्यशोधक बेलोरा शाखेने सत्यशोधकमते विवाह लावले. या प्रकरणी चिडून जाऊन जनार्दन नारायण भट याने यशवंतराव खुशालराव देशमुख (अध्यक्ष), राजाराम भगवानजी डवरे (सचिव), हरिभाऊ गोपी महानुभाव, कृष्णाजी सोनाजी माळी (कोरडे), सूर्यभान, उन्नाजी, श्रावणजी, जाणूजी आदी आठ बेलोरेकर सत्यशोधकांवर मुकदमा नं. ८३० नुसार ९७ रुपयांच्या दक्षिणेचा दावा मोर्शी, जिल्हा अमरावती कोर्टात १९०२ साली दाखल केला.
सत्यशोधक धार्मिक खटल्याच्या परंपरेनुसार मोर्शी न्यायालयात बेलोरेकर सत्यशोधकांचा आरंभी पराभव झाला. १० ऑक्टोबर १९०६ रोजी राजाराम डवरे आणि अन्य प्रतिवादी बेलोरेकर सत्यशोधकांनी नव्या दमाने या प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. या न्यायालयाने सत्यशोधकांकडून निर्णय दिला. पुढे १९०६ साली जनार्दन नारायण याने नागपूर ज्युडिशल कमिशनर जे. के. व्याटन यांच्या कोर्टात प्रस्तुत दावा दाखल केला. दिनांक १३ एप्रिल १९०७ रोजी न्यायमूर्ती व्याटन यांनी जनार्दन नारायण यांची केस फेटाळताना म्हटले की, समस्त प्रतिवादी हे सत्यशोधक समाज नामक पंथाचे अनुयायी आहेत. या पंथाने ब्राह्मण पुरोहित नाकारला आहे. या दाव्यातील प्रतिवादी आणि त्यांचे कुटुंब समाजाचे अनुयायी असल्यामुळे प्रस्तुत दावा फेटाळत आहे. थोडक्यात, १८९० सालच्या ओतूर खटल्यानंतर प्रस्तुत बेलोरा अभियोगाने विदर्भात धार्मिक वातावरण ढवळून काढले. या बाबीचे बरेचसे श्रेय राजाराम डवरे यांच्याकडे जाते.
राजाराम डवरे हे शिकले-सवरलेले सत्यशोधक असून त्यांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. ‘आयुर्वेद डॉक्टर-संजीवनी’ ही चाळीस पानांची पुस्तिका त्यांच्या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01