विकासाचा एकच नारा,छगन भुजबळ यांना प्रचंड मताने विजयी करा

विकासाचा एकच नारा,छगन भुजबळ यांना प्रचंड मताने विजयी करा

लासलगाव येथे भव्य प्रचार रॅलीमध्ये आवाहन
लासलगाव,दि.१७ नोव्हेंबर :- रस्ते, पाण्यासह अनेक पायाभूत सुविधा निर्माण करणारे आणि देशभरात नावाजले जातील असे प्रकल्प आणणारे छगन भुजबळ हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत. म्हणूनच विकासाचा एकच नारा, छगन भुजबळ यांना प्रचंड मताने विजयी करा, असा जयघोष आज दिवसभर लासलगाव येथे दिसून आला. निमित्त होते ते आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य प्रचार रॅलीचे.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गटाचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.१७ नोव्हेंबर) दुपारी २ ते सायंकाळी ६ या काळात या रॅली संपन्न झाल्या. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. रॅलीला भगरीबाबा मंदिर येथून प्रारंभ झाला.
त्यानंतर ही रॅली उमा हॉटेल मार्गे शिवाजी चौक – शनिमंदिर रोड – पिंजार गल्ली – पाटील गल्लीग – शिंपी गल्ली – झेंडा चौक या मार्गे जाऊन प्रचार कार्यालय – एस.टी.डेपो येथे आली. तेथे रॅलीचा समारोप झाला.
यावेळी डी.के.जगताप, रामनाथ शेजवळ, बालेश जाधव, मंगेश गवळी,बबन शिंदे, युनिस तांबोळी, परसराम घोडे, राजेंद्र घोडे, भूषण लाघवे,दीपक गायकवाड यांच्यासह महायुती घटक पक्षातील उमेदवार उपस्थित होते.
आज येवल्यात रॅली
येवला शहरात सकाळी ९ ते २ या वेळेत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रचार रॅलीला येवला शनी पटांगण – थिएटर – आझाद चौक – देवी खुंट – आईना मस्जिद – जुना माळीपुरा – मलिक मेंबर घर – नागड दरवाजा – बुंदेलपुरा – सनी पटणी घर – मेन रोड – खांबेकर खुंट – शिंपी गल्ली – काळा मारुती – गंगा दरवाजा – फत्तेबुरुज नाका – डीजी रोड – खांबेकर खुंट मार्गे पुढे जाऊन इंद्रनील हॉटेल आणि नंतर संपर्क कार्यालय येथे सांगता होणार आहे. या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुती घटक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



