सोशल

पंढरपुरात ११ हजार १११ वारकऱ्यांना मोफत तुळशीची रोपे; गायत्री परिवाराचा पर्यावरण व संस्कार जपणारा उपक्रम

📰 दीनबंधू न्यूज |

पंढरपुरात ११ हजार १११ वारकऱ्यांना मोफत तुळशीची रोपे; गायत्री परिवाराचा पर्यावरण व संस्कार जपणारा उपक्रम

सोलापूर | प्रतिनिधी

अखिल विश्व गायत्री परिवार, महाराष्ट्र शाखेतर्फे आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या ११ हजार १११ वारकऱ्यांना मोफत तुळशीच्या रोपांचे वितरण करण्यात येणार आहे. हा उपक्रम रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री शिवाजी महाराज मोरे, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) तसेच उपविभागीय अधिकारी सचिन ढेपे (MCS) यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परमवंदनीय माता भगवती देवी शर्मा यांच्या जन्मशताब्दी आणि अखंड दीप शताब्दी वर्षानिमित्त गायत्री परिवार “हर घर तुलसी, हर हृदय संस्कार” हे अभियान राबवत आहे. तुळशीच्या रोपांद्वारे पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागरूकता आणि संस्कारमूल्यांचा प्रसार करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून, वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

✍️ संपादकीय संदेश

वारकरी संप्रदाय हा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारांचा वाहक आहे. तुळशीसारख्या पवित्र वनस्पतीचे मोफत वितरण हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम आहे. अशा विधायक उपक्रमांमुळे समाजात निसर्गप्रेम, आरोग्य आणि संस्कारांची जपणूक अधिक बळकट होईल, हीच अपेक्षा.

— दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📲 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 7387377801 हा नंबर जोडा.
👍 बातमी लाईक करा | 📤 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📩 फॉरवर्ड करा | 💬 कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button