🔥 विद्यार्थ्यांवरील अन्याय, जातनिहाय जनगणना आणि ओबीसी हक्कांसाठी सोलापुरात १३ संघटनांचा एल्गार; सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची रणशिंग फुंकली! 🔥

🚨 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
🔥 विद्यार्थ्यांवरील अन्याय, जातनिहाय जनगणना आणि ओबीसी हक्कांसाठी सोलापुरात १३ संघटनांचा एल्गार; सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची रणशिंग फुंकली! 🔥
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
सोलापूर : दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सोनकवाडे गुरुजी प्रतिष्ठान, कुमठा नाका, सोलापूर येथे विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस सत्यशोधक शंकरराव लिंगे उपस्थित होते. बैठकीत सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत दिल्लीतील विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन, विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय, सामाजिक न्यायाचे प्रश्न, ओबीसी समाजावरील अन्याय, जातनिहाय जनगणनेची तातडीची आवश्यकता तसेच सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षणाशी संबंधित गंभीर प्रश्नांवर सरकार प्रभावी उपाययोजना करत नसल्याची भावना व्यक्त झाली. तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बैठकीत दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, यासाठी राज्यभर जनजागृती व व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
सोलापूर शहरातील ओबीसी समाजातील सुमारे ८० समाजांना एकत्र आणून सामाजिक न्यायासाठी व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. समाजामध्ये सुरू असलेल्या संभ्रमाला दूर करून एकसंघ लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत उपस्थित सर्व प्रतिनिधींनी सकारात्मक, साधक-बाधक चर्चा करून पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची दिशा आणि पुढील ध्येयधोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीला १३ विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
✍️ संपादकीय संदेश
विद्यार्थ्यांवरील अन्याय, सामाजिक न्याय आणि जातनिहाय जनगणना हे केवळ एका समाजाचे नव्हे तर देशाच्या लोकशाहीचे प्रश्न आहेत. संविधानाने दिलेले हक्क मिळवण्यासाठी संघटित, शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढा उभारणे ही काळाची गरज आहे. समाज एकत्र आला तरच न्यायाचा आवाज अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचू शकतो.
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 7387377801
हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
#Hashtags
#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #OBC #जातनिहायजनगणना #SocialJustice #StudentsProtest #DelhiProtest #Education #Constitution #SocialMovement #Solapur #OBCUnity #JusticeForStudents #CasteCensusNow #मागासवर्ग #सामाजिकन्याय #विद्यार्थीआंदोलन #सोलापूर #लोकशाही









