डॉक्टर जयश्री लिंगे-गवळी यांचे निधन 5 जुलै 2024 रोजी झाले आहे. त्यांचा दहाव्या चा कार्यक्रम, दशक्रिया अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी सात वाजता चंद्रभागा-भीमा नदीच्या काठावर मुंडेवाडी, ता. पंढरपूर येथे होणार आहे.

डॉक्टर जयश्री लिंगे-गवळी यांचे निधन 5 जुलै 2024 रोजी झाले आहे. त्यांचा दहाव्या चा कार्यक्रम, दशक्रिया अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी सात वाजता चंद्रभागा-भीमा नदीच्या काठावर मुंडेवाडी, ता. पंढरपूर येथे होणार आहे.
शोकाकुल: लिंगे, गवळी परिवार
डॉक्टर जयश्री गवळी महिला डॉक्टराची आत्महत्या ! विनम्र अभिवादन!
डॉ. जयश्री प्रशांत गवळी BAMS MS स्त्रीरोगतज्ञ (सत्यशोधक उद्योगपती ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे व सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांची लाडली ग्रेट जेष्ठ कन्या) यांचे शुक्रवार दि ०५-०७-२०२४ रोजी दुपारी एक वाजता दुःखद अकस्मात निधन झाले.
डॉक्टर जयश्री लिंगे-गवळी यांचा जन्म २० जानेवारी १९८५ रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला. लिंगे कुटुंबांमधील ती पहिलीच मुलगी असल्याने लिंगे परिवारात सर्वांची लाडकी होती सर्व लिंगे परिवारामध्ये तिला मानाचे स्थान होते सर्वजण तिचा सन्मान करत होते आदर्श घेत होते तिच्या जन्मानंतर लिंगे कुटुंबाची अतिशय वेगवान प्रगती झाली KG ते १०वी पर्यंत शिक्षण शंकरराव मोहिते-पाटील इंग्लीश स्कूल, धवलनगर, अकलुज येथे झाले. ११ वी १२वी सायन्स साईडने सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज येथे झाले. BAMS वैद्यकिय शिक्षण विजापुर येथील BDL कॉलेज मध्ये झाले.
नंतर २००९-१० युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ञ म्हणुन प्रॅक्टिस केली.०९ डिसेंबर २०१० रोजी त्यांचे लग्न डॉ. प्रशांत केराप्पा गवळी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या बरोबर झाले. दोघांनीही पेनुर मधील सावता माळी शॉपींग सेंटर मधील एका गाळ्यामध्ये वैद्यकिय सेवेचे काम चालु केले. तेथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतःचे पेनूर मध्ये सहा गुंठे जागेत पंढरपुर रोड सुसज्ज असे बांधकाम करुन श्री साईकृपा हॉस्पिटल नावाने सेवा चालु केली. त्यामध्ये डिलेव्हरी, महिलांचे रोग, X-Ray, सोनोग्राफी, लहान मोठी ऑपरेशनची सेवा देत होते. डॉ. जयश्रीने बेळगांव जिल्हातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर M.S.ची डिग्री संपादन केली. त्यांचे पती प्रशांत गवळी यांचे कोडोली-कोल्हापूर येथे BAMS झाले होते. त्यांनीही लग्नानंतर M.D. मेडिसीन ची डिग्री कर्नाटकातून मिळवली.
दोघांच्या सहकार्याने चांगली वैद्यकिय सेवा सोलापुर, पंढरपुर शहरापेक्षा ४०- ते 50 टक्के कमी दराने देत होते. डॉ. जयश्रीची सेवा २४तास चालु होती, त्यामुळे त्यांचे नाव पेनूर आणि आसपासच्या २०-२५ गावात प्रसिद्ध झाले होते. डॉ. जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, मनमिळाऊ आणि सेवाभावी होता. त्यांना महाराष्ट्र मध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही तरी तीने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही. कर्नाटक मध्ये प्रवेश मिळवुन कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचे पेपर इंग्लिश मध्ये देऊन डॉक्टर बी. ए.एम.एस. ही पदवी जिद्दीने मिळवली. जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी होती. डॉ. जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे १५० पदार्थ बनवण्याचीही कला हस्तगत होती. त्या सुगरण होत्या. कोणतेही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या.कामगार आला नाही तरी त्यांचे सर्व काम झाडलोट, धुणेभांडी, स्वयंपाक स्वयंस्तुतीने आनंदाने करत होत्या. हरहुन्नरी कष्टाळू स्वाभिमानी होत्या.त्यांना भाषण करणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये हरहुन्नरीने भाग घेणे इत्यादी गोष्टीची ही आवड होती.
डॉ. जयश्री गवळी यांची पेनूर मधील १४ वर्षाची वैद्यकिय अविरत सेवा इतराने आदर्श ध्यावा अशी होती. आदर्श अशा डॉ. जयश्री प्रशांत गवळी यांचा शुक्रवार दि. ०५ जुलै २०२४ रोजी दुपारी एक वाजता लाईफलाईन हॉस्पीटल पंढरपूर मध्ये अकस्मीत देहांत झाला. त्यांना सतत अपमानित जीवन जगावे लागत होते त्यांना सतत नंदाचा त्रास होता त्यांच्या छळाला कंटाळून डॉक्टर जयश्री गवळी यांनी आत्महत्या केली ज्या आवडल्या सर्वांना त्याच आवडल्या निर्मिकाना ईश्वराना या ईश्वर नितीस इलाज नाही. त्यांच्या पश्चातदोन मुली,-सई वय बारा वर्षे ७वीत , सिद्धी वय 11 वर्षे सहावीत, एक मुलगा साई सिनियर केजीत शिकत आहे.पती डॉ. प्रशांत केराप्पा गवळी वय 40, सासरे डॉ. के. टी. गवळी वय ७५ वर्षे व सासु सौ. निर्गुणा केराप्पा गवळी वय ६८ वर्षे, असा परिवार आहे. जयश्री गवळी ह्या लिंगे परिवारातील पहिल्या डॉक्टर होत्या
डॉ. जयश्री प्रशांत गवळी यांच्या अचानक निधनाने पेनूर पंचक्रोशितील सर्व जनता हळहळ करत होती. त्यांचे पार्थिव पंढरपूरहून रात्री १० वाजता आले तरीसुद्धा अंतयात्रेस हजारो नागरीक महिला लहानथोर गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होती. गोरख गवळी गुरुजी आणि सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी श्रध्दांजलीचे भाषण करून अभिवादन केले. सर्वांनी दोन मिनीटे उभे राहुन- श्रद्धांजली वाहिली. आदर्श डॉक्टर सौ जयश्री प्रशांत गवळी (बी ए एम एस, एम एस) स्त्रीरोगतज्ञ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!!
तिसरा रक्षा सावडण्याचा विधी पेनुर ता. मोहोळ जिल्हा सोलापुर येथील स्मशानभूमित रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी संपन्न झाला यावेळी हजारोच्या संख्येने पेनुर पंचक्रोशीतील नागरिक प्रतिष्ठित मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी जयश्रीच्या मैत्रिणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय माळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे सर प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर सर पेनुर चे कस्तुरे मालक यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयश्री गवळी यांचे पिताश्री सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना कन्याशोक अनावरण झाला त्यांनीही शोक संदेश देऊन श्रद्धांजली वाहिली सर्व नागरिकांनी दोन मिनिट उभा राहून श्रद्धांजली वाहिली जयश्री यांच्या निधनानंतर फोन करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब शोक संदेश दिला त्यांचे प्रतिनिधी म्हणून रवी सोनवणे साहेब लिंगे गवळी कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते सांगली सातारा पुणे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून लिंगे गवळी परिवारांचे नातेवाईक सकाळी साडेसहा वाजता रात्रभर प्रवास करून रक्षा सावडण्याचा कार्यक्रमाला उपस्थित होते शुक्रवारी दुपारपासून जयश्रीच्या निधनाबद्दल फेसबुक व्हाट्सअप फोन वरून समक्ष भेटून लाखो लोकांनी हळहळ व्यक्त करून डॉक्टर जयश्री गवळी यांना विनम्र अभिवादन केले आहे
.दहाव्याचा विधी मुंढेवाडी, ता. पंढरपूर येथे रविवारी १४ जुलै रोजी सकाळी ७ वा. आहे. अकराव्याचा विधी पेनूर येथे स्वगृही सोमवारी १५ जुलै रोजी आहे.
शोकाकुल गवळी- लिंगे परिवार.