ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास

*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास*
*आधी केली पाटीलकी, पैशाची केली उधळण*
*सरत आल्या जमिनी, आता मागते आरक्षण*
*आंदोलनाच्या नावाखाली, टाकला आहे फास*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*आधी म्हणे आम्हीच उच्च, इतर सारे गौण*
*आता कसे लालसेने, सांगा सुटले यांचे मौन!*
*वेळोवेळी सांगत आले, आम्ही आहोत खास*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*ओबीसींचे सुख यांच्या, डोळ्यांत आता सलते*
*मुजोर होऊन बघा कसे, बोलून राहीले भलते*
*सरसकट आरक्षणाची, उरात ठेवली आस*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*ओबीसीच्या नेत्यांवर, यांनी ओढला आसूड*
*इतर नेत्यांसोबत यांची, सुरू झाली लुडबूड*
*मुख्यमंत्री यांचेच झाले, तरी नाही विश्वास*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*मीडियावर यांचेच चित्र, आम्ही यापासून दूर*
*अन् आमचे बांधव आहेत, आपल्यातच चूर*
*उद्या मात्र होईल आमच्या, आयुष्याचा ऱ्हास*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*आता मात्र लढावं लागेल, रस्त्यांवरती येऊन*
*निषेध करा प्रत्येकांनी, आता निवेदने देऊन*
*आरक्षण वाचविण्याची, धरा प्रत्येकांनी कास*
*ओबीसींच्या लेकरांचा, हिरावला जातो घास…*
*आम्ही सर्व ओबीसी*
*महाराष्ट्र राज्य*

अगदी बरोबर आहे. आता ओबीसीने जागे होऊन चळवळ उभी केली तरच न्याय मिळू शकेल नाही तर ओबीसी च्या भावी पिढ्याच भविष्य अंधःकारमय होईल. उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो. जय ओबीसी.