राजकारण

🔥 पंकजाताई मुंडे यांनी आता ओबीसी नेतृत्वाची धुरा स्वीकारावी! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडविण्याची हीच वेळ? 🔥

🔥 पंकजाताई मुंडे यांनी आता ओबीसी नेतृत्वाची धुरा स्वीकारावी! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडविण्याची हीच वेळ? 🔥

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादकीय – सत्यशोधक शंकरराव लिंगे

काँग्रेसमधील ओबीसी नेते वडकीवार यांनी पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये येण्याचे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी महिला मुख्यमंत्री होण्याचे खुले आवाहन केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

पंकजाताई मुंडे यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्तीची भावना व्यक्त केल्याची चर्चा सुरू असताना, हा प्रस्ताव केवळ पक्षांतराचा नसून महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्वाच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

माझ्या मते, कदाचित ही वेळ आजच आलेली नाही; परंतु पुढील दोन-तीन वर्षांच्या राजकीय बांधणीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. पंकजाताई मुंडे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रात ओबीसींच्या हक्कांसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. ही केवळ राजकीय संधी नसून काळाची गरज आहे.

आज एका बाजूला पंकजाताई मुंडे नाराजी व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांना सत्तेपासून दूर राहावे लागल्याची चर्चा आहे. तर ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना राज्यसभा आणि इतर महत्त्वाच्या राजकीय संधींपासून वंचित ठेवल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. अनेक वेळा त्यांना मंत्रीपदासाठी संघर्ष करावा लागला. रायगडमध्ये ओबीसी नेत्या अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाबाबतही वाद निर्माण झाले.

अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की, महायुतीमध्ये ओबीसींना नेमके स्थान कुठे आहे?

भाजपकडून वारंवार “ओबीसी हा आमचा डीएनए आहे” असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात ओबीसींना न्याय मिळत असल्याचे चित्र दिसत नाही, अशी भावना अनेक ओबीसी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

ओबीसी उपसमितीच्या बैठका अत्यल्प होतात. तळागाळात काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांना चर्चेसाठी पुरेशी संधी मिळत नाही. ओबीसी महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाहीत. महाज्योतीसारख्या संस्थांना आवश्यक जागा, इमारती, कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. अनेक ओबीसी वसतिगृहांची कामे वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली ही उपेक्षा आजही कायम असल्याची टीका होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विविध शासन निर्णय, समित्यांच्या शिफारशी आणि कुणबी प्रमाणपत्रांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रक्रियेमुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर परिणाम झाल्याचा आरोप अनेक ओबीसी संघटना करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा नव्याने विचार करून ओबीसी समाजाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारावी. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी समाज एकत्र येण्याची गरज आहे.

आम्ही रात्रंदिवस संघर्ष करू, रक्ताचे पाणी करू, हाडाच्या काड्या करू; पण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाने, सर्व ओबीसी नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन भविष्यातील लढ्यासाठी सज्ज व्हावे. अन्यथा पुढील पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.

ही केवळ एका व्यक्तीची लढाई नाही; तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची, प्रतिनिधित्वाची आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाची लढाई आहे.

— सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ

📢 संपादकीय संदेश

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 संपर्क : 7387377801

हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

✅ आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387377801 हा क्रमांक ॲड करा.
✅ बातमी लाईक, शेअर, सबस्क्राइब, फॉरवर्ड आणि कमेंट करा.
✅ बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

हॅशटॅग

#पंकजाताई_मुंडे #OBC #ओबीसी #SocialJustice #Reservation #MaharashtraPolitics #दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीTV #ShankarraoLinge #OBCLeadership #Constitution #सामाजिक_न्याय

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button