राजकारण

🔥 बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाचा झंझावात! एका दिवसात तीन ग्रामशाखा अध्यक्षांची नियुक्ती; “अगोदर जातनिहाय जनगणना, नंतरच मतदान”चा एल्गार!

🔥 बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाचा झंझावात! एका दिवसात तीन ग्रामशाखा अध्यक्षांची नियुक्ती; “अगोदर जातनिहाय जनगणना, नंतरच मतदान”चा एल्गार!

बुलढाणा | प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघाने बुलढाणा जिल्ह्यात संघटन विस्ताराची अभूतपूर्व मोहीम सुरू करत एका दिवसात आंबेटाकळी, करतवाडी आणि गवंढाळा या तीन गावांमध्ये ग्रामशाखा अध्यक्षांची नियुक्ती करून संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे. मा. योगेश गजानन भड, मा. पवन सपकाळ आणि मा. रूपेश गजानन इंगळे यांच्यावर ग्रामशाखा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून बुलढाणा जिल्हा आता संघटन विस्तारात आघाडीवर झेपावत असल्याची चर्चा सुरू आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त गावोगाव, वाडी-वस्ती, तांडे आणि पाड्यांपर्यंत पोहोचून महात्मा फुले यांचे विचार घराघरात नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर ओबीसी समाजावरील अन्याय, अत्याचार, प्रलंबित प्रश्न आणि घटनात्मक हक्कांबाबत व्यापक जनजागृती करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी “अगोदर जातनिहाय जनगणना, नंतरच मतदान!” हा नारा देत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी प्रभावीपणे लागू कराव्यात, ओबीसींच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करावे आणि विद्यार्थी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या संविधानिक अधिकारांची माहिती गावोगावी पोहोचवावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

लवकरच ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. या अभियानात प्रत्येक गावात संघटन मजबूत करून ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या तिन्ही नियुक्त्यांनंतर बुलढाणा जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्याला मोठी चालना मिळाली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजहितासाठी आणि ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी ही लढाई अधिक व्यापक करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

✍️ संपादकीय संदेश

बदलाची सुरुवात नेहमी गावपातळीवरून होते. संघटन मजबूत असेल तर समाजाचा आवाज अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचतो. लोकशाही मार्गाने समाजजागृती, संघटन आणि घटनात्मक मागण्यांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेली ही मोहीम आगामी काळात अधिक व्यापक स्वरूप धारण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 WhatsApp : 73 87 37 78 01

✅ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राइब करा.
📲 फॉरवर्ड करा.
💬 कमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button