सोलापूर

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीत अँड. संतोषकुमार बाराचारे यांची वकिलांसाठी सर्वसमावेशक विकासाची ग्वाही; मोफत ग्रुप विमा योजनेचा संकल्प चर्चेत

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीत अँड. संतोषकुमार बाराचारे यांची वकिलांसाठी सर्वसमावेशक विकासाची ग्वाही; मोफत ग्रुप विमा योजनेचा संकल्प चर्चेत

सोलापूर, दि. ३ ऑगस्ट :
सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत खजिनदार पदाचे उमेदवार अँड. संतोषकुमार प्रभाकर बाराचारे यांनी वकिलांच्या हितासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांची घोषणा केली आहे. बार असोसिएशनचा निधी पारदर्शकपणे वापरणे, लेखा व्यवहारांची नियमित नोंद ठेवणे, वकिलांसाठी पौष्टिक आहार सुविधा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, नवोदित वकिलांना मार्गदर्शन तसेच बार रूममध्ये ब्रॉडबँड व ऑनलाईन न्यायालयीन कामकाजासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा निर्धार आहे.

विशेषतः वकिलांसाठी सरसकट ग्रुप विमा योजना राबविण्याचा त्यांचा संकल्प चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडील काळात अनेक वकिलांच्या अपघाती मृत्यू व जखमी होण्याच्या घटना लक्षात घेऊन ही योजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दिल्ली बार कौन्सिलच्या धर्तीवर जीवन विमा व आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बार असोसिएशनच्या माध्यमातून नवोदित वकिलांना प्रोत्साहन, न्यायिक अधिकारी व सरकारी वकिलांचा सत्कार, समन्वय समितीची स्थापना, तसेच मनोरंजन व आरोग्यवर्धक उपक्रम राबविण्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. वकिलांच्या सुरक्षिततेसह बारच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

संपादकीय संदेश

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक ही केवळ पदांची निवड नसून वकिलांच्या भवितव्याशी निगडित दिशा ठरविणारी प्रक्रिया आहे. वकिलांच्या सुरक्षिततेसाठी विमा संरक्षण, पारदर्शक आर्थिक कारभार, नवोदितांना मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधा यांसारखे मुद्दे आजच्या काळाची गरज आहेत. निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने न देता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. बारची ताकद ही त्याच्या सदस्यांच्या एकतेत आणि कल्याणकारी धोरणांमध्ये असते. त्यामुळे प्रत्येक मतदाराने विचारपूर्वक मतदान करून सक्षम नेतृत्वाची निवड करावी.

— संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

📢 आपल्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 7387377871 हा नंबर ॲड करा.

👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377871

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button