सोशल

🔴 सोलापुरात पूज्य मुनिश्री १०८ सुप्रसन्नसागरजी महाराज यांच्या चातुर्मासानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांची घोषणा; पत्रकार परिषदेत मान्यवरांची उपस्थिती

🔴 सोलापुरात पूज्य मुनिश्री १०८ सुप्रसन्नसागरजी महाराज यांच्या चातुर्मासानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांची घोषणा; पत्रकार परिषदेत मान्यवरांची उपस्थिती

सोलापूर, दि. २७ जुलै : श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने पूज्य मुनिश्री १०८ सुप्रसन्नसागरजी महाराज यांच्या चातुर्मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पत्रकार परिषदेत श्री सुनील गांधी, श्री संजोग गांधी, पूज्य सुकुमारजी चंकेश्वर, सुधीर पंडितजी, श्री धनंजय शहा आणि श्री सुहास कोनरी हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी चातुर्मास, गुरु पौर्णिमा आणि वीर शासन जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावर्षी पूज्य मुनिश्री १०८ सुप्रसन्नसागरजी महाराज यांचा चातुर्मास श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर, शुक्रवार पेठ, सोलापूर येथे होत असून, देशभरातील मुनिश्रींचे शिष्य, ब्रह्मचारी, व्रती, श्रावक-श्राविका तसेच जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख कार्यक्रम

२८ जुलै २०२६ (मंगळवार), सकाळी ७.३० वा. – चातुर्मास मंगल कलश स्थापना.

२९ जुलै २०२६ (बुधवार) – गुरु पौर्णिमा महोत्सव व राष्ट्रीय हिंदी धार्मिक निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ.

३० जुलै २०२६ (गुरुवार), सकाळी ८.०० वा. – वीर शासन जयंती महोत्सव.

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 ७३८७७३७८०१

➡️ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
🔄 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📤 फॉरवर्ड करा.
💬 कॉमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button