सोशल

सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आज पत्रकार परिषदेत अनावरण

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आज पत्रकार परिषदेत अनावरण

सोलापूर, दि. २७ जुलै : सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ या भव्य चित्रकला प्रदर्शनाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला कांचन गोडाळे व वर्षा निरंजन उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, हे प्रदर्शन दि. २८ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पू. ना. गाडगीळ अँड सन्स, डफरीन चौक, सोलापूर येथे भरविण्यात येणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध हास्यसम्राट व चित्रकार दीपक देशपांडे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य सचिन गायकवाड राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ चित्रकार डॉ. पद्मा देशपांडे, पू. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी तसेच डॉ. लता गोडाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनात मंडला आर्टसह आध्यात्मिक, पारंपरिक आणि आकर्षक कलाकृती रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रदर्शन दररोज सकाळी ११.०० ते रात्री ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार असून कला रसिक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रकार कांचन गोडाळे यांनी केले आहे.

📍 स्थळ : पू. ना. गाडगीळ अँड सन्स, डफरीन चौक, सोलापूर.

दिनबंधू न्यूज व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा

📲 संपर्क : 7387377801

👍 बातमी लाईक करा
📤 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📨 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सॲप चॅनल व ग्रुप फॉलो करायला विसरू नका!

#दिनबंधून्यूज #ShivkrantiTV #KanchanGodale #चित्रांकन #ArtExhibition #Solapur #MarathiNews #BreakingNews #PaintingExhibition #सोलापूर #चित्रकला #कला

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button