सोलापूर

अखिल भारतीय माळी महासंघात महिला व युवक नेतृत्वाला मोठी संधी; सुचिता वानखडे जिल्हा सचिव तर नितीन हिरळकार खामगाव शहराध्यक्षपदी नियुक्त!

🟨
अखिल भारतीय माळी महासंघात महिला व युवक नेतृत्वाला मोठी संधी; सुचिता वानखडे जिल्हा सचिव तर नितीन हिरळकार खामगाव शहराध्यक्षपदी नियुक्त!

बुलढाणा | प्रतिनिधी :
अखिल भारतीय माळी महासंघाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात दोन महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सौ. सुचिता गोपाल वानखडे यांची बुलढाणा जिल्हा सचिव (महिला आघाडी – घाटावरील) तर मा. नितीन अर्जुन हिरळकार यांची खामगाव शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही नियुक्त्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहरात आनंदाचे वातावरण असून महिला व युवक नेतृत्वाला बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सौ. सुचिता गोपाल वानखडे या गणेश नगर, बुलढाणा येथील रहिवासी असून महात्मा जोतीबा फुले मराठी शाळेत शिक्षिका तसेच महात्मा जोतीबा फुले मंडळाच्या संचालिका आहेत. त्यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. वसुधा रामकृष्ण येनकर, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी (घाटावरील) मा. सौ. प्रितीताई विशाल खंडारे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी (घाटाखालील) मा. सौ. सरलाताई काळे आणि प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. ज्योतीताई निरपासे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

तसेच मा. नितीन अर्जुन हिरळकार (जगदंबा रो संस्थान, घटपुरी, ता. खामगाव) यांची खामगाव शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती मा. शरदभाऊ बनकर (अमरावती विभाग अध्यक्ष), मा. गजाननभाऊ हिरळकार (जिल्हा उपाध्यक्ष – घाटाखालील), मा. विष्णुभाऊ इंगळे (बुलढाणा जिल्हाध्यक्ष – घाटाखालील) आणि मा. गणेश जनार्दन बोबडे (खामगाव तालुका अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

या नियुक्त्यांनंतर दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका स्तरावर ठराव मंजूर करून ते केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील. तसेच जातनिहाय जनगणनेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावागावात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

याशिवाय ओबीसी समाजावरील अन्याय, अत्याचार आणि प्रलंबित मागण्यांसाठी गावागावातून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व शासनाकडे निवेदने सादर करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. संघटन मजबूत करून सामाजिक न्यायासाठी अधिक प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दोन्ही नियुक्त्यांचे अभिनंदन करणारे मान्यवर

या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभय तायडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष (घाटावरील) मा. विजय राजाभाऊ खरात, बुलढाणा जिल्हा कार्य मार्गदर्शक मा. हारीभाऊ राजनकर, जिल्हा संघटक (घाटाखालील) मा. नानासाहेब पाटील, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी मा. सरलाताई काळे, जिल्हा उपाध्यक्ष (घाटाखालील) मा. साहेबराव बोदडे, मा. विलास मसने, मा. संजय दाते, नांदुरा तालुकाध्यक्ष मा. विलास खाडे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष मा. विजय सातव, संग्रामपूर तालुकाध्यक्ष मा. गणेश वानखडे, मोताळा तालुकाध्यक्ष मा. मुकुंदा माळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. केशवराव सोनुने, मा. राजेश द. मेहेत्रे, प्रदेश संघटक (डॉक्टर सेल) मा. डॉ. गजानन अजगर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल मा. डॉ. संजय कानकटाव, जिल्हा उपाध्यक्ष कर्मचारी आघाडी मा. भानुदास हुडेकर, जिल्हा सरचिटणीस मा. प्रा. दिपक नन्हई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. गजानन बांडे, बुलढाणा तालुकाध्यक्ष मा. राजेंद्र पवार, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष मा. रमेश माधवराव उबाळे, चिखली तालुकाध्यक्ष मा. जनार्दन सपकाळ, चिखली तालुका अध्यक्षा महिला आघाडी मा. गीताताई गजानन बांडे, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष मा. काशिनाथ (प्रकाश) खांडेभराड, मेहेकर तालुकाध्यक्ष मा. अमोल मगर, चिखली शहर अध्यक्षा महिला आघाडी मा. छायाताई विष्णू वानेरे, चिखली तालुका अध्यक्ष किसान आघाडी मा. रामभाऊ किसन अवचार, चिखली शहर उपाध्यक्षा महिला आघाडी मा. दिपाली शामकुमार मोळवणे आणि चिखली शहर उपाध्यक्ष मा. दिपक देशमाने (राजे) यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

महिला आणि युवक नेतृत्वाला समान संधी देत अखिल भारतीय माळी महासंघाने बुलढाणा जिल्ह्यात संघटन विस्ताराला नवी दिशा दिली आहे. जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सामाजिक न्यायासाठी गावागावात जनजागृती करण्याचा निर्धार या नव्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

🟨 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737871

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button