राजकारण

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाटोद्यातील सभेत नागरिकांची अलोट गर्दी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाटोद्यातील सभेत नागरिकांची अलोट गर्दी

[gspeech-button]

ग्यानी आणि ध्यानी नदीचे संवर्धन व सौंदर्यीकरण करणार – मंत्री छगन भुजबळ

पुढील पाच वर्षातील प्रत्येक मिनिट मतदारसंघातील नागरिकांसाठी – मंत्री छगन भुजबळ

येवला,पाटोदा,१६ नोव्हेंबर :- येवला मतदारसंघाच्या भविष्यासाठी आपण अनेक महत्वपूर्ण विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. मतदारसंघात ही विकासाची कामे करण्यासाठी आपल्या सर्वांचे बळ मला हवे आहे. आपण दिलेल्या बळावर पुढील पाच वर्षातील प्रत्येक मिनिट मतदारसंघातील नागरिकांच्या विकासासाठी असेल तसेच राज्य सरोवर संवर्धन योजनेमधून ग्यानी आणि ध्यानी नदीचे संवर्धन व सौंदर्यीकरण केले जाईल असे प्रतिपादन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज पाटोदा येथे भव्य जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रचार प्रमुख अंबादास बनकर,ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, किसनकाका धनगे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, भोलानाथ लोणारी, राजाभाऊ लोणारी,प्रमोद सस्कर, संजय पगारे,किशोर सोनवणे,गणपत कांदळकर, अशोक मेंगाणे, श्रावण वाघमारे, मच्छिंद्र थोरात, रमेश बोरनारे, आयुब पठान, बाळासाहेब पिंपरकर, अण्णा दौंडे,शकील नाईकवाडी, डॉ.प्रवीण बुल्हे, संतोष दौंडे, बाळासाहेब कुऱ्हे,देविदास शेळके, अशोक संकलेचा, सविता बोराडे, रियाज मुलानी, गुड्डू जावळे, मारोतीराव घोरपडे, रईस देशमुख, अंकुश बोराडे,साहेबराव आहेर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पाटोदा गटात आपण अनेक सभामंडप, बुद्ध विहार, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय इमारती केल्या. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आपण बांधली.अनेक गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण आपण केले.रस्ते पुलांची अनेक कामे आपण केली. १० कोटी मधून शिरसगाव लौकी – पाटोदा ते आडगाव रेपाळ ते कातरणी हा १२ किमी चा रस्ता आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून करतो आहे. उरलेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी सुद्धा आपण बांधील आहे.विखरणी आणि पाटोदा या ठिकाणी विद्युत उपकेंद्र निर्माण केल्यामुळे वीजेची समस्या सुटली आहे. जऊळके आणि सोमठाण देश या ठिकाणी नवीन विद्युत उपकेंद्र आपण निर्माण करणार आहोत.तसेच या भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीसाठी सुसज्य अभ्यासिका निर्माण केली जाईल.

यावेळी अंबादास बनकर म्हणाले की, पाटोदा परिसराने शब्द दिला की पाटोदाकर आपला शब्द कधीही बदलत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात आरोग्य, रस्ते, पूल,बंधारे,कालवा,विजेचे तसेच सिंचनाची अनेक कामे करण्यात आली आहे.या मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या सारख्या कर्तृत्वान नेत्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता मंत्री छगन भुजबळ यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button