अंदरसुल येथे फुलांची उधळण करत मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत

अंदरसुल येथे फुलांची उधळण करत मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत

येवला तालुक्यातील वीजेची गरज भागविण्यासाठी महापारेषणचे १३२ केव्ही क्षमतेचे अति उच्च दाब उपकेंद्र निर्माण करू- मंत्री छगन भुजबळ
*येवला,अंदरसुल,दि.१६ नोव्हेंबर :-*अंदरसूल,गवंडगाव आणि कोटमगाव या ठिकाणी विद्युत उपकेंद्र निर्माण केल्यामुळे वीजेची समस्या सुटली आहे.अंगुलगाव आणि वडगाव बल्हे या ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राचे काम सुरु आहे.पुढील काळात आपण पिंपळगाव जलाल येथे नवीन विद्युत उपकेंद्र निर्माण करणार आहोत.कोटमगाव विद्युत उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए केली जाईल.संपूर्ण येवला तालुक्यातील भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन अंदरसूल किंवा धामणगाव च्या भागामध्ये महापारेषणचे १३२ केव्ही क्षमतेचे अति उच्च दाब उपकेंद्र निर्माण केले जाईल असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज अंदरसुल येथे भव्य जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे,ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, नंदकिशोर धनगे, संजय पगारे, राजभाऊ लोणारी, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, किशोर सोनवणे, मच्छिंद्र थोरात, अमोल सोनवणे, धनंजय कुलकर्णी, भाऊ लहरे, वैशाली शिंदे,डॉ.स्वाती सोनवणे, संतोष केंद्रे, माणिकराव कळमकर, पंढरीनाथ सोनवणे, गोरख नेवासकर, बाळासाहेब काळे, अंकुश सोळशे, गुलाबराव जानराव, अशोक घोडेराव, भागवत नेवासकर, चांगदेव भागवत, सुदाम गायकवाड, बाबुराव सोमासे, कैलास सोमासे, देविदास निकम, मच्छिंद्र मोरे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,फकीरभाई पठाण, बद्री कोल्हे,पौलस आहिरे,बाळू धुमाळ,कचरू चव्हाण यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रख्यात असलेल्या नागेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये ४ कोटी रुपयांची विकास कामे केली.अद्यापही येथे विकासकामांना मोठा वाव असल्याने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून या परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल.राज्य सरोवर संवर्धन योजनेमधून नागेश्वर महादेव मंदिराला वळसा घालून वाहणाऱ्या कोळगंगा नदीचे संवर्धन व सौंदर्यीकरण आपण करणार आहोत.अंदरसुल हे तालुक्यातील सर्वात मोठे प्रगत बाजारपेठ असलेले गाव या गावाशी दैनंदिन संपर्क असलेल्या सर्व गावे खेड्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचे काम करत आहोत.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून ४ कोटी रुपयांमधून राज्य महामार्ग २ ते धामणगाव हा ४ किमी चा काँक्रीट रस्ता आपण करत आहोत.दुगलगाव ते उंदीरवाडी हा ८ कोटीमधून ९.५०० किमी रस्ता आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून करतो आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून ७.५० कोटी रुपयांमधून अंदरसुल ते कौटखेडा या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण आपण करणार आहोत.आडगाव चोथवा ते अंदरसुल आणि अंदरसुल-जयहिंदवाडी,अंदरसुल-करंजी,अंदरसुल-गोल्हेवाडी,अंदरसुल-देवानंदवाडी,अंदरसुल-धामणगांव,अंदरसुल-पांजरवाडी या रस्त्याचे कामे मंजूर असून काही कामे सुरू तर काही लवकरच सुरू होतील. उरलेले रस्ते करून देण्यासाठी सुद्धा आपण बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,पक्षाच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल माणिकराव शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आज त्यांनाच पक्षाचे तिकीट देऊन उभे करण्यात आले अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली. लोकांना विकास हवा असेल तर छगन भुजबळ कायम तत्पर आहे. ज्यांना एकमेकांचे पाय ओढणारे आणि स्थानिक राजकारण करणारी हवी आहे. हा ज्यांचा त्यांचा निर्णय असल्याचा चिमटा त्यांनी काढला.महायुती सरकारच्या वतीने अनेक महत्वपूर्ण योजना सुरु करण्यात आलेल्या असून पूर्ण होतील अशीच वचने महायुती सरकारच्या वतीने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने प्रवेशद्वाराची उभारणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह निर्माण केले जाईल.या भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीसाठी सुसज्य अभ्यासिका निर्माण केली जाईल.अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन केले जाईल.धामणगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तर अंगुलगाव, उंदीरवाडी या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र निर्माण केले जाईल. तसेच जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील ७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला जिल्हास्तरीय समिती, अर्थ विभाग, नियोजन विभाग आणि मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती मध्ये मान्यता प्राप्त झाली असून लवकरच हा विकास आराखडा मंजूर होईल असे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून आज तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तसेच पर्यटनासाठी विविध विकासाची कामे मतदारसंघात केली आहे. मतदारसंघातील जनता त्यांना विक्रमी मतांनी निवडून देतील असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी केले.
येवल्याच्या पैठणीसाठी पर्यटन केंद्र निर्माण झाल्याने आज येवल्याची पैठणी जगभरात पोहचली आहे.मुक्ती भूमीचा विकास केल्याने आज दरवर्षी लाखोंच्या संख्येने बांधव येवल्यात येत आहे.मांजरपाडा प्रकल्पाचा फायदा येवला मतदारसंघाला झाला आहे.या प्रकल्पाचा फायदा हा पालखेड कालव्याला देखील झाला आहे.सरकारमध्ये सहभागी झाल्याने आज मतदारसंघाला दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघाचा परिपूर्ण विकास केला असून या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय हा निश्चित असल्याचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.
माथाडी कामगारांचा मंत्री छगन भुजबळ यांना पाठींबा
महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी येवला बाजार समितीच्या प्रांगणात माथाडी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व माथाडी कामगार मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊ असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



