सोलापूर

🔥 शिक्षणातून परिवर्तनाची रणशिंग फुंकणार! चिखली तालुक्यात शिक्षक शक्तीचे संघटन; विनायक जाधव यांच्याकडे शिक्षक आघाडीची धुरा !

🔥 शिक्षणातून परिवर्तनाची रणशिंग फुंकणार! चिखली तालुक्यात शिक्षक शक्तीचे संघटन; विनायक जाधव यांच्याकडे शिक्षक आघाडीची धुरा !

चिखली (जि. बुलढाणा) : अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिक्षक आघाडीला मोठी बळकटी देत मा. विनायक पुरुषोत्तम जाधव यांची चिखली तालुका अध्यक्ष (शिक्षक आघाडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष मा. विजय राजाभाऊ खरात, प्रदेशाध्यक्ष शिक्षक आघाडी मा. मनीषजी गिऱ्हे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. प्रितीताई विशाल खंडारे, जिल्हा सरचिटणीस मा. प्रा. दीपक नन्हई आणि चिखली तालुका अध्यक्ष मा. जनार्दन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

बी.एस्सी., बी.एड. शिक्षण घेतलेले आणि जिल्हा परिषद हायस्कूल, चिखली येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. विनायक जाधव हे उच्चशिक्षित, अभ्यासू, परिवर्तनवादी विचारांचे शिक्षक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी चिखली शहर शिक्षक आघाडीचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी काम केले आहे.

निवडीनंतर बोलताना श्री. जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तालुक्यातील सर्व शिक्षकांना एकत्र आणून परिवर्तनवादी शिक्षक चळवळ उभी करणार. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समतावादी महापुरुषांचे विचार गावागावात पोहोचवणार. जातनिहाय जनगणना, ओबीसींचे न्याय्य हक्क, सामाजिक न्याय, संविधान मूल्ये आणि शैक्षणिक प्रबोधनासाठी व्यापक जनजागृती अभियान राबवणार.”

त्यांनी पुढे आवाहन केले की, डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सुशिक्षित समाजबांधवांनी अखिल भारतीय माळी महासंघात सहभागी होऊन सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभे राहावे.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सांगितले की,

“समाजात क्रांती घडवायची असेल तर शिक्षक हा सर्वात प्रभावी घटक आहे. शिक्षकच विद्यार्थी घडवतो, विद्यार्थी समाज घडवतो आणि समाज राष्ट्र घडवतो. त्यामुळे शिक्षक आघाडी ही महासंघाची परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी गौरव वर्षात अशा उच्चशिक्षित, विचारवंत शिक्षकांची नियुक्ती ही सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.”

श्री. विनायक जाधव यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर, अभय तायडे, केशवराव सोनुने, राजेश मेहेत्रे, जनाबापू मेहेत्रे, डॉ. गजानन अजगर, शरद बनकर, विष्णुभाऊ इंगळे, डॉ. संजय कानकटाव, भानुदास हुडेकर, प्रा. दीपक नन्हई, गजानन बांडे, राजेंद्र पवार, रमेश उबाळे, गीताताई बांडे, प्रकाश खांडेभराड, अमोल मगर, छायाताई वानेरे, रामभाऊ अवचार, दिपाली मोळवणे, मोहन मेहेत्रे, दीपक देशमाने (राजे) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

समाज बदलायचा असेल तर शिक्षक बदल घडवतात. विचारांची मशाल पेटवणारा शिक्षक हा कोणत्याही परिवर्तनवादी चळवळीचा कणा असतो. अखिल भारतीय माळी महासंघाने शिक्षक शक्तीला संघटित करण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधान मूल्ये मजबूत करणारा ठरेल. शिक्षित समाजच संघटित समाज घडवू शकतो आणि संघटित समाजच परिवर्तन घडवू शकतो.

— दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हा क्रमांक नक्की जोडा : 7387377801

👍 बातमी लाईक करा | 🔄 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा | 📲 फॉरवर्ड करा | 💬 कमेंट करा | 📢 दिनबंधू न्यूज व्हॉट्सअॅप चॅनल व ग्रुपला फॉलो करायला विसरू नका.

#हॅशटॅग

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #विनायकजाधव #शिक्षकआघाडी #शिक्षकशक्ती #सामाजिकपरिवर्तन #महात्माज्योतिरावफुले #सावित्रीबाईफुले #डॉबाबासाहेबआंबेडकर #ओबीसी #जातनिहायजनगणना #संविधान #समता #बंधुता #सत्यशोधकशंकररावलिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button