ग्रामस्थ/मतदार मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर दिनांक 08/10/2024
प्रेस नोट
ग्रामस्थ/मतदार मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर दिनांक 08/10/2024
प्रति,
मा. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर
विषय – मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील लघुपाठ बंधारे तलावामध्ये पाणी सोडण्यास नकार दिलेमुळे मतदान प्रक्रीया वर बहिष्कार टाकत असले बाबत
संदर्भ – 1. कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. 08 यांचेकडील जा.क्र./उकावि.08/प्रशा-3/4874/2024 दिनांक 04/10/2024 चे पत्र.
महोदय,
आम्ही सोबत प्रमाणे स्वाक्षरी करणारे ग्रामस्थ मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट मार्फत मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील लघुपाठ बंधारे तलावामध्ये संदर्भ नुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे 11 यांचे अखत्यारित असलेले कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. 08 यांचेकडे आम्ही वारंवार पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केलेला आहे असे असताना जाणीव पुर्वक आमच्या गावाकडे दुर्लक्ष करुन पाणी सोडण्यासाठी कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र.08 यांच्या मार्फत नकार देण्यात येत आहे.
आमच्या गावामध्ये पावसाळा संपला असता तरी सदयस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असुन उपलब्ध जलस्त्रोतांच्या आधारे पाण्याची गरज भागविणे शक्य होत नाही, दैनंदिन जिवन जगण्यासाठी पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी शासनाची उदासिनता लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने वारंवार केलेले प्रयत्न विफल गेलेले आहेत, एकीकडे शासन मोठया प्रमाणात मतदार जनजागृती करीत असताना आम्हा ग्रामस्थांची मतदान करण्यासाठी इच्छा होत नाही, ठरावीक भागासाठी पाणी सोडण्याची शासनाची मानसिकता ही मौजे हालचिचोळी येथे राहणारे ग्रामस्थ हे मनुष्य नसून जनावरे असल्याची भावना शासनाने निर्माण करुन आम्हा सर्व ग्रामस्थांना तसी वागणूक मिळत आहे.
निवडणुका येतील जातील पण ग्रामस्थांना पाणीच नाही मिळाले तर पुढच्या निवडणुकीला मतदान करण्यासाठी हालचिंचोळी ग्रामस्थांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने पाण्याविना गाव सोडून स्थलांतर व्हावे लागेल याचे भान आम्हा सर्व ग्रामस्थांना असल्याने चालु निवडणुकीमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, लोकशाही प्रक्रीयेत शासन हे मायबाप असतात याची आम्हाला जाणीव आहे, मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील लघुपाठ बंधारे तलावात पाणी सोडल्यास लोकशाही गणराज्यात राहत असल्याचा आम्हास अभिमान असणार आहे, तसा अभिमान यापुर्वीही होता पण आम्हा ग्रामस्थांवर कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र.08 यांनी जो अन्याय केला आहे, त्यावरुन आमचा लोकशाही मधील शासन प्रक्रीयेवरील विश्वास कमी होत असून त्याचाच एक भाग म्हणूण आम्ही शांततेच्या मार्गाने मतदानावर बहिष्कार टाकीत आहोत.
महेरबान शासनाने कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्र. 08 यांना सुचना देऊन तात्काळ
मौजे हालचिंचोळी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील लघुपाठ बंधारे तलावामध्ये पाणी सोडण्याचा आदेश देऊन आम्हास तसा न्याय दयावा हि विनंती आहे.
प्रत-
मा उपविभागीय अधिकारी, तथा निवडणुक निर्णय अधिकारी, अक्कलकोट विधानसभा मतदार संघ 2. मा. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार 250- अक्कलकोट विधानसभा मतदार संघ
3. मा. सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी 250-अक्कलकोट विधानसभा मतदार संघ,
मानव सिद्राम बोडके 9960819555
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01