🌳 अमर झालेली आजी – सत्यशोधक विचारांची जिवंत साक्ष 🌳

🌳 अमर झालेली आजी – सत्यशोधक विचारांची जिवंत साक्ष 🌳
इंदापूर तालुका आज एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटनेचा साक्षीदार ठरला आहे.
महात्मा फुले प्रणित सत्यशोधक समाजाच्या विचारांनुसार दशक्रिया विधी करून,
मरणालाही अर्थ देणारा आणि जीवनाला दिशा देणारा आदर्श
बोराटे कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे.
अखिल भारतीय माळी महासंघाचे पुणे जिल्हा अ
ध्यक्ष
माननीय अमर भिकाजी बोराटे
(रा. अंथुरणे, ता. इंदापूर, जि. पुणे)
यांच्या आजी
कै. राधाबाई धोंडीबा बोराटे (वय १०२ वर्षे)
यांचे दिनांक ७/२/२०२६ रोजी निसर्गविलीन झाले.
🌼 १०२ वर्षांचे खणखणीत आयुष्य – एक जिवंत प्रेरणा
कै. राधाबाई आजी हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते,
तर शंभर वर्षांपूर्वीची शुद्ध, संयमी आणि निसर्गाशी एकरूप जीवनशैली यांचा जिवंत आदर्श होत्या.
१०२ वर्षांचे आयुष्य जगताना त्या क्वचितच आजारी पडल्या.
विशेष म्हणजे,
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या आवाजानेच
“अण्णा आला का?”
असे विचारत त्या आजी ओळखत असत —
ही गोष्ट त्यांच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीचे आणि जिवंतपणाचे प्रतीक होती.
परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीचे विदारक वास्तव असे की,
आजी निसर्गात विलीन झाल्या,
त्यांचा तिसरा रक्षा सावडण्याचा दिवशीच त्यांचा ६३ वर्षांचा नातूही निसर्गविलीन झाला.
यातून शंभर वर्षांपूर्वीची जीवनशैली
आणि आजची तणावपूर्ण जीवनपद्धती
यातील प्रचंड फरक प्रकर्षाने समोर येतो.
🔥 दहनविधी व सत्यशोधक दशक्रिया विधी
कै. राधाबाई आजींचा दहनविधी घराजवळील शेतात,
मुलं, मुली, नातवंडे, पणतवंडे आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर दिनांक ९/२/२०२६ रोजी
महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या विचारांनुसार,
त्यांच्या राहत्या घरासमोर
दशक्रिया विधी अत्यंत साधेपणाने, वैज्ञानिक आणि मानवतावादी पद्धतीने संपन्न झाला.
🌱 अस्थी विसर्जन नाही, तर स्मृतीवृक्षाचे रोपण
अंधश्रद्धा, नदी प्रदूषण आणि कर्मकांडाला नकार देत,
घराशेजारील शेतात खड्डे खोदून
सर्व अस्थिरक्षा एकत्रित करून
त्याठिकाणी स्मृतीवृक्षाचे रोपण करण्यात आले.
हा वृक्ष म्हणजे
👉 कै. राधाबाई आजींची आठवण
👉 पुढील पिढ्यांसाठी सावली
👉 आणि समाजासाठी पर्यावरणाचा संदेश
आज त्या वृक्षाखाली उभे राहिल्यावर
प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण होते —
“आपली आजी आजही आपल्याला सावली देते,
आणि गोड फळांसारख्या आठवणी देते.”
👨👩👧👦 कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग
या संपूर्ण सत्यशोधक विधीत
त्यांचे चिरंजीव
श्री भिकाजी बोराटे,
श्री गणपत बोराटे,
मुलगी सौ. सैनाबाई बाबूराव शिंदे,
सून सौ. आनंदाबाई गणपत बोराटे,
नातू श्री अमर बोराटे, योगेश, अमित,
नाती सौ. अश्विनी राजेंद्र हिरवे (सुपे),
सौ. सुनिता लालासो टेंबरे (बरड),
सौ. अनिता शंकर ढगे (माळशिरस),
सौ. वनिता जयसिंग लिंगे (अकलूज, सोलापूर),
सौ. शीतल शिवराज लोखंडे (कोरेगाव, सातारा),
नातसुना नीता व अमृता,
१२ पणतवंडे,
तसेच उपस्थित मान्यवर
श्री जयसिंग लिंगे,
श्री लोखंडे (कोरेगाव),
श्री पांडुरंग जगताप (बोरी),
श्री उत्तम शिंदे,
श्री हरिश्चंद्र नाळे (फलटण),
श्री ज्ञानदेव बोराटे,
श्री अंकुश बोराटे,
श्री रतन बोराटे
यांनी मनापासून सहभाग घेतला.
🌸 आईच्या स्मृतीतून समाजकार्य
कोरोना काळात
माननीय अमर बोराटे यांच्या माताही निसर्गात विलीन झाल्या.
त्यांच्या नावाने लावलेला स्मृतीवृक्ष
गेल्या पाच वर्षांपासून फळे देत आहे,
आणि दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त
समाजातील कर्तृत्ववान महिलांना
‘लक्ष्मी आई माता पुरस्कार’
देऊन मातृशक्तीचा सन्मान केला जातो.
🔥 सत्यशोधक विचारांचा नवा दीपस्तंभ
हा उपक्रम म्हणजे
👉 अंधश्रद्धेला नकार
👉 पर्यावरण संरक्षण
👉 आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती
आज बोराटे कुटुंबाचे पाहुणे, मित्रमंडळी
सत्यशोधक समाज स्वीकारत आहेत,
हेच या कार्याचे खरे फलित आहे.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
सत्यशोधक शंकरराव लिंगे
यांच्याकडून
कै. राधाबाई धोंडीबा बोराटे आजींना
अजिन भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,
हीच निर्मिक चरणी प्रार्थना.
जय ज्योती | जय क्रांती | जय भीम | जय शिवराय | जय संविधान | जय भारत 🌷
94 220 68 771 शंकरराव लिंगे: सत्यशोधक विधीकार , भिमराव कोथिंबिरे* 9421690800. अखिल भारतीय माळी महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष , *अमर भिकाजी बोराटे 9763471083*.







