सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.130

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.130

पुढे देऊळगावराजा येथे इ. स. २००६ साली भरलेल्या चौथ्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. या प्रसंगी ‘सत्यशोधक साहित्य संमेलनाची अध्यक्षीय भाषणे’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. ते या ग्रंथाचे सहसंपादक आहेत.

विठ्ठलराव टेकाळे सध्या बुलडाणा जिल्हा सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष आहेत.

ठाकरे

केशव सीताराम (१७-०९-१८८५-२०-११-१९७३)

व्यासंगी सत्यशोधक संशोधक, राजर्षी शाहूंचे परमस्नेही ‘प्रबोधन’कार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म पनवेल, जिल्हा रायगड येथे १७ सप्टेंबर १८८५ रोजी झाला. ठाकरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. १९०३ साली ते मॅट्रिक झाले. त्यांची इंग्रजी भाषेवरही चांगली पकड होती. ते नाट्यलेखकही होते. अधूनमधून ते नाटकात आणि चित्रपटातही भूमिका करत असत.

ठाकरे यांनी आरंभी रेल्वेत काही वर्षे नोकरी केली. पुढे पी. डब्ल्यू. डी. खात्यात हेडक्लार्क होते. छायाचित्रकार, विमा एजंट, पेंटिंग, टंकलेखन आदी व्यवसायही त्यांनी केले. ठाकरे यांचे वाचन चौफेर होते. ते फर्डे वक्ते होते. इ. स. १९१८ पासून त्यांचा ब्राह्मणेतर चळवळीशी संबंध आला. पुढे १६ ऑक्टोबर १९२१ रोजी त्यांनी पुणे येथून ‘प्रबोधन’ हे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकात सत्यशोधक मताचा राबता राहिल्याने येथून पुढे ठाकरे ‘प्रबोधन’ कार म्हणून ख्यात झाले. ‘सारथी’, ‘लोकहितवादी’ आदी नियतकालिकेही त्यांनी चालविली. त्यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकातही विपुल लेखन केले. इ. स. १९२५ सालच्या अमरावती येथील गाजलेल्या सत्यशोधक आणि अन्य परिषदांवर त्यांनी परखड भाषेत वृत्तांत प्रसिद्ध केला. तसेच कोल्हापूरकर राजर्षी शाहू महाराजांशी त्यांचे परमस्नेहाचे संबंध होते.

इ. स. १९७३ मध्ये प्रसिद्ध झालेले ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button