राजकारण

येवला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज-बिपिन कटारे

येवला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज-बिपिन कटारे

येवला,दि.१५ नोव्हेंबर:- येवला- लासलगाव विधानसभा मतदासंघातील अधिकृत उमेदवार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रचारार्थ मुखेड व देवगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेस प्रामुख्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे हे उपस्थित होते सभेस संबोधित करतांना बिपिन अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की,येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते जोमने कामाला लागले आहेत.

भुजबळ साहेबांनी शेतकऱ्यांचे,शेतमजुरांचे, व्यापारी वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्याची सकारात्मक भूमिका वारंवार घेतली आहे. मांजरपाडा पाणी प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित होता परंतु भुजबळांनी तो प्रश्न देखील मार्गी लावल्याने समस्त शेतकरी वर्ग छगनराव भुजबळ साहेबांना धन्यवादच देत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा 1935 साली केली व 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली 1956 ते 2004 पर्यंत येवला मुक्ती भूमी येथे बौद्ध बांधवांना कुठली सुविधा नव्हती परंतु अलीकडे भुजबळांनी मुक्ती भूमीची भव्य दिव्य इमारत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दिमाखदार ब्रांझचा भव्यदिव्य पुतळा उभारून समस्त बौद्ध समाजामध्ये एक आदराचे स्थान निर्माण केले आहे. भुजबळ साहेबां सारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत जाणे आवश्यक आहे ते राज्यपातळीवरील नेते आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लागू शकतील असा विश्वास आहे असे बिपिन कटारे यांनी शेवटी संगितले.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button