छगन भुजबळांकडून येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पुढील विकासाचा रोडमॅप जाहीर
छगन भुजबळांकडून येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पुढील विकासाचा रोडमॅप जाहीर
छगन भुजबळ यांच्या हस्ते वचननाम्याचे प्रकाशन
विकासपर्वाला लाभणार मोठी गती
येवला,दि.१५नोव्हेंबर :– येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे. गेल्या वीस वर्षात येवला-लासलगावचा कायापालट झाला असून यापुढील काळात विकासपर्वाला आणखी गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
येथील संपर्क कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी या वचननाम्याचे प्रकाशन केले. याप्रसंगी प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,अर्शद सिद्दीकी, अरुण थोरात, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, राजश्री पहिलवान ,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी,संपत वाघ,धनंजय कुलकर्णी,अमजद शेख, डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय, दत्ता निकम, साहेबराव आहेर, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, शरद राऊळ यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरासाठी १.४० दलघमी पाणी उपलब्ध करुन देतानाच नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे, वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी पार-गोदावरी प्रकल्प पूर्ण केला जाईल. त्याशिवाय विविध बंधारे, कालवे, एस्केप गेट, तलाव आदींची कामे केली जाणार आहेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षात अनेक कामे केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पैठणी क्लस्टर कार्यन्वित करणे, रेशीम व्यवसायासाठी खुली बाजारपेठ निर्माण करणे, चिखलदरा आणि बारामतीच्या धर्तीवर रेशीम पार्क साकारणे, राष्ट्रीय पातळीवरील पैठणी फेस्टिव्हल आयोजित केला जाईल. त्यात विविध स्पर्धा, कार्यक्रम आदींचा समावेश असेल. यातून देशभरात येवला पैठणीचे मार्केटिंग केले जाईल. ग्राहकांना आकर्षित केले जाईल. याचा थेट आणि मोठा फायदा पैठणी व्यवसाय व उद्योगाला होईल. यावर आधारीत कारागीरांना सुगीचे दिवस येतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
चिंचोडी आणि विंचूर येथील औद्योगिक वसाहतीत कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाणार आहे. कांदा, कापूस आणि मका या पिकांवरील प्रक्रिया उद्योगामुळे मोठी गुंतवणूक येण्यासह रोजगार निर्मिती होईल. चिंचोडीत सर्व सुविधा उपलब्ध असून तेथील भूखंडांच्या प्रचलित दरात सवलत दिली जाईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
स्वच्छ, सुंदर व हरीत लासलगाव आणि येवला
मतदारसंघातील दोन्ही शहरे स्वच्छ, सुंदर आणि हरीत बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण, विल्हेवाट यावर विशेष काम केले जाईल. निफाड पूर्व गावांसाठी लासलगावला अप्पर तहसील कार्यालय साकारले जाईल, येवला शहर बाह्य वळण रस्ता तसेच मालेगाव-येवला-शिर्डी महामार्ग काँक्रिटचा सहापदरी केला जाईल. येवल्यात पासपोर्ट सुविधा केंद्र, नवीन दुय्यम निबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,नवीन पोस्ट ऑफिस आणि डाक निर्यात केंद्र साकारले जाईल, असे ते म्हणाले.
पर्यटनस्थळांचा विकास
मुक्तीभूमी स्थळ आणि कोटमगाव जगदंबा मंदिर परिसराचा विकास आराखडा केला जाईल.त्याशिवाय लासलगाव येथे भव्य संविधान भवन, ममदापूर येथे विशेष वन महोत्सव, काळवीट सफारी, वन उद्यान साकारले जाणार आहे. अनकाई किल्ल्याच्या ठिकाणी साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधांमध्ये वाढ
येवल्यात स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय, येवला रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट, अंदरसूल आणि देवगाव येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, खेडलेझुंगे, नांदूरमध्यमेश्वर, धामणगाव, चिंचोडी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे.
युवक-युवतींसाठी
मतदारसंघातील युवक आणि युवतींसाठी सुसज्ज पोलिस व लष्कर भरती पूर्व अकादमी, कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, ई लायब्ररी, वाचनालय, पैठणी उद्योगाशी संबंधित कोर्सेस आदींची उपलब्धता करुन दिली जाणार आहे..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा .दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा