महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.33
महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.33
महात्मा फुले : साहित्य आणि
चळवळ
२०
त्यांचा दर्जा तत्वतः समान आहे. तर्कबुद्धी आणि सदसद्धिविवेकबुद्धी या मनुष्यमात्राला स्वभावतःच लाभलेल्या ईश्वराच्या अमूल्य देणग्या आहेत. त्यात कमीजास्तपणा असेल, पण त्यांचा ज्याच्या ठिकाणी लवलेशही नाही असा माणूस आढळणार नाही. म्हणून माणसामाणसांत देश, वंश, पंथ, दर्जा, लिंग इत्यादी बाबींवरून भेदभाव करणे हे ईश्वरी योजनेशी विसंगत आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या मनुष्यत्वाची बूज राखली पाहिजे, आणि सर्वांशी बरोबरीच्या नात्याने वागले पाहिजे असा पेन यांचा दृष्टिकोन होता.
ईश्वर आणि मानव यांचा संबंध लक्षात घेता, जगातील सर्व माणसांचा धर्म वास्तविक एकच असावयास हवा. परंतु नजीकच्या काळात तरी अशा विश्वधर्माची स्थापना अशक्यप्राय आहे हे पेन यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यांचा निःशंकपणे पुरस्कार केला. प्रत्येक व्यक्तीला वा लोकसमूहाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे ईश्वराची उपासना करण्यास मोकळीक मिळाली पाहिजे. या बाबतीत शासनाने किंवा कोणत्याही अन्य संस्थेने ढवळाढवळ करणे योग्य नाही. मात्र कुणाच्याही धार्मिक स्वातंत्र्याला इतरांच्या असहिष्णुतेमुळे किंवा आततायीपणामुळे धोका उत्पन्न झाला, तर त्याला संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे त्यांचे ठाम मत होते. पेन यांनी आपल्या या धर्मविषयक मतप्रणालीला ‘मानवतेचा धर्म’ (Religion of Humanity) असे नाव दिले आहे. ही संज्ञा त्यांनीच प्रथम उपयोगात आणली असे त्यांचे चरित्रकार डॉ. कॉनवे यांनी म्हटले आहे. पेन यांचे वडील क्वेकर पंथाचे होते. बालपणात पेन यांच्या मनावर क्वेकर पंथाच्या ‘अंतःप्रकाशाचा पर्म’ (Religion of Inner Light) याचे संस्कार झालेले होते. त्यात व्यक्तीची प्रतिष्ठा व आत्मप्रामाण्य या कल्पना अंतर्भूत आहेत हे उघड आहे. पेन यांच्या ग्रंथांची नुसती नावे जरी पाहिली तरी, त्यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, न्याय, मनुष्याचे नैसर्गिक हक्क व जबाबदारी, बुद्धिनिष्ठा इत्यादी तत्त्वांना आपल्या मतप्रतिपादनात प्राधान्य दिले आहे हे सहज लक्षात येते. ‘The word is My country, my religion is to do good *** ‘जग हाच माझा देश आहे, सर्वांचे भले करणे हा माझा धर्म आहे.’ हे पेन यांचे ब्रीदवाक्य पाहिले की, साहजिकच आपल्या विचारसरणीला त्यांनी दिलेले ‘मानवतेचा धर्म’ हे नाव अन्वर्थक आहे असे वाटल्याखेरीज राहात नाही.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01