शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे किल्ला स्पर्धेचे आयोजन
प्रेस नोट
शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे किल्ला स्पर्धेचे आयोजन
यंदा २५ वे वर्ष : शितल मालुसरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सोलापूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक आणि लोकमंगल फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा शालेय महाविद्यालय आणि खुल्या गटात होईल. शनिवार २६ ऑक्टोबर सकाळी ११ ते मंगळवार २९ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यत स्पर्धकांनी शिवस्मारकच्या नवी पेठ येथील प्रांगणात किल्ले बनवायचे आहेत. मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता किल्ला स्पर्धेचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या १२ व्या वंशज शितल मालुसरे यांच्या हस्ते होणार आहे.
एका शाळेस १० जणांचा एक गट असे कितीही गट पाठवता येतील. किल्ला बनविण्याकरिता १० बाय १० फुटांची जागा, दगड, माती, मुंबई माती, पाणी संयोजकांकडून प्रत्येक गटाला उपलब्ध करून दिली जाईल. हे किल्ले पाहण्यासाठी नागरिकांना बुधवार ३० ऑक्टोबरपासून सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहेत.
प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्यास तीन हजार रुपये तर तृतीय विजेत्यास दोन हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उल्लेखनीय सहभागाकरिता शाळेच्या शिक्षकास, उत्कृष्ट सांघिक काम करणाऱ्या गटास, किल्ल्याची व्यवस्थित माहिती देणाऱ्या गटास विशेष पारितोषिक देण्यात येणार आहेत.
किल्ला स्पर्धा नियमावली
१) १० x १० फुटाची जागा प्रत्येक गटाला उपलब्ध करून दिली जाईल. त्यात ८५ ८ चा किल्ला करावयाचा आहे.
२) किल्ला बनविण्या करिता मर्यादित दगड, माती, मुंबईमाती, पाणी आयोजका कडून पुरविली जाईल.
३) स्पर्धा शालेय, महाविदयालय व खुल्या गटात होईल.
४) किल्ला शनिवार दि २६/१०/२०२४ सकाळी ११.०० ते मंगळवार २९/१०/२०२४ दु. ३.०० वाजेपर्यंत बनवावेत.
५) एका शाळेस दहा जणांचा एक गट असे कितीही गट पाठविता येतील.
६) मंगळवार दि २९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता स्पर्धेतील किल्ल्यांचे उदघाटन व परीक्षण होईल.
७) नागरिकांकरिता किल्याचे प्रदर्शन बुधवार दि ३०/१०/२०२४ पासून सकाळी १०.०० रात्री १०.०० पर्यंत खुले राहील.
८) स्पर्धे करिता नाव नोंदणी गुरुवार दि २४ /१०/ २०२४ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत शिवस्मारक कार्यालयात करावी.
९) प्रत्येक गटातील नाव नोंदणी शाळेच्या अधिकृत पत्रावर संबंधित शिक्षकांच्या सहीने पाठवावी.
१०) शालेय व महाविदयालय गटातील सहभागी विध्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली किल्ला बनवावा.
११) स्पर्धेत ऐतिहासिक किल्ला करावा अशी अपेक्षा आहे.
१२) परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
१३) प्रत्येक गटात रोख पारितोषिक, स्मृति चिन्ह, प्रमाणपत्र व स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
१४) विशेष पारितोषिके उल्लेखनीय सहभाग करिता शाळेच्या शिक्षकास, उत्कृष्ट सांघिक काम करणारा
गटास, किल्ल्याची व्यवस्थित माहिती देणारा गटास.
वरील सर्व विजेत्या गटा करिता निशुल्क गड दर्शन सहल आयोजित करण्यात येणार आहे.
स्थान : शिवस्मारक पटांगण, नवी पेठ, सोलापूर.
सहभाग : निशुल्क
संपर्क : शिवस्मारक कार्यालय, दूरभाष मल्लिनाथ व्हटकर ०२१७- २७२९८१०, ९८२२४९८३७३
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01