सोशल

शरणगाथा क्रमशा.33

शरणगाथा क्रमशा.33

समतावादी श्रमगौरवाचा महिमा अधोरिखित करतात. शरणांनी सत्यशुद्ध कायकाचा आग्रह धरला आहे. बसवण्णांचे हे वचन ती भूमिकाच ठासून सांगते.

त्त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्त्वमेव ! त्त्वमेव विद्या च द्रविणं त्त्वमेव, त्त्वमेव सर्वम् मम देवदेवं !!

हे सुभाषित आपण अनेकवेळा ऐकलंय. देवच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे संस्कृत सुभाषितकारांनी या श्लोकातून सांगितले आहे. तूच माता, तूच पिता, तूच बंधू आणि सखाही तूच. नातेसंबंध इतकेच नाही तर विद्या धन आणि सर्वस्व तूच असल्याच्या भावना या श्लोकातून सुभाषितकारांनी ईश्वराप्रती व्यक्त केल्या आहेत. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी आपले आराध्य दैवत पंढरीच्या विठु माऊलीबद्दल याच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई’ असून पुंडलिक हा बंधू असल्याचे नाथ बाबांनी म्हटले आहे. संत आणि महापुरुषांनी ईश्वराला आपले सर्वस्व मानले आहे. खुद महात्मा बसवण्णांनीही आपले आराध्य दैवत कुडलसंगमदेवास सर्वस्व मानले आहे. ते आपल्या एका वचनात म्हणतात

पिता तुम्हीच, माता तुम्हीच

बंधू तुम्हीच, नातेवाईक तुम्हीच

आपल्याशिवाय मला कोणीही नाहीत, कुडलसंगमदेवा

(समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ४८१) बसवण्णांनी ईश्वरास माता, पिता, बंधू, सखा मानले आहे. कुडलसंगमदेवाशिवाय

आपल्याला कोणीही नसल्याचे ते सांगतात. या पार्श्वभूमीवर शिवयोगी सिद्धरामेश्वरांची महात्मा बसवण्णांप्रती असलेल्या अन्योन्य भक्तीतील समर्पण भाव लक्ष वेधून घेतो. बसवण्णांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेल्या शरणांनी त्यांचा मुक्त कंठाने गौरव केला आहे. योगियांचेयोगी अल्लमप्रभुदेव, चन्नबसवण्णा, कक्कय्या, अप्पण्णा, अक्कमहादेवी, माचय्या, चौडय्या यांच्यासह समकालीन बहुतेक शरणांनी आपल्या वचनांतून बसवण्णांची महती गायली आहे. मात्र या सर्वांमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांची गोष्ट वेगळी आहे. योगिकुलचक्रवर्ती शिवयोगी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिद्धरामेश्वरांनी आपले आराध्य दैवत कपिलसिध्द मल्लिकार्जुनास सांगतात की, बसवण्णा हेच माझे आई अणि बसवण्णा हेच माझे बाबा आहेत.

बाराव्या शतकातील शरणांपैकी आज सर्वाधिक शिलालेख शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या इतिहासाचे साक्षीदार म्हणून अस्तित्त्व टिकवून आहेत. सर्वाधिक वचने सिद्धरामेश्वरांची आज उपलब्ध आहेत. आपण ६८ हजार वचनांची रचना केल्याचे स्वतः ते एका वचनात सांगतात. ते अनुभव मंटपाचे तिसरे अध्यक्ष होते. समकालीन अनेक शरणांनी शिवयोगी

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button