जाफराबादमध्ये माळी महासंघाची दमदार एन्ट्री! डॉ. रमेश मोठे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा; ओबीसी जनगणना व संघटन विस्तारासाठी आक्रमक रणशिंग!

🚩 जाफराबादमध्ये माळी महासंघाची दमदार एन्ट्री! डॉ. रमेश मोठे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा; ओबीसी जनगणना व संघटन विस्तारासाठी आक्रमक रणशिंग!
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
जाफ्राबाद (जि. जालना) : अखिल भारतीय माळी महासंघाने जालना जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग देत मा. डॉ. रमेश सांडुजी मोठे (मु.पो. ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांची जाफ्राबाद तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मा. गणेश आसाराम हरकळ (जिल्हाध्यक्ष, जालना), मा. कार्तिक बेहेरे (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), मा. अप्पासाहेब गोरे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) आणि मा. बबनराव घायाळ (जालना जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
ही निवड जाफ्राबाद तालुक्यासाठी ऐतिहासिक मानली जात असून, अखिल भारतीय माळी महासंघाचा पहिलाच तालुकाध्यक्ष म्हणून डॉ. रमेश मोठे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जालना जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यात महासंघाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
नियुक्तीनंतर डॉ. रमेश मोठे यांनी तालुक्यात तळागाळापर्यंत संघटना पोहोचवणे, गावागावांत शाखा उभारणे, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा उभारणे, जातनिहाय जनगणनेसाठी ग्रामपंचायतींमधून ठराव मंजूर करून ते शासनापर्यंत पोहोचविणे, तसेच विविध निवेदने व जनआंदोलने प्रभावीपणे राबविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विश्वस्त मा. विठ्ठलजी तोडकर, विश्वस्त मा. गोविंदजी वैराळे, मा. विठ्ठलजी सातव, मा. दामोदर रामकृष्ण गाडगे, मा. प्रभाकरजी सातव, मा. भिमरावजी कोथिंबीरे, मा. अमर बोराटे, प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. वसुधा येनकर, प्रदेशाध्यक्ष शिक्षक आघाडी मा. मनीषजी गिऱ्हे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. अभय तायडे, प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी मा. सौ. ज्योती निरपासे, प्रदेश संघटक मा. जनाबापू मेहेत्रे, प्रदेश संघटक (डॉक्टर आघाडी) मा. डॉ. गजाननजी अजगर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. माधुकरजी घिरके, मा. राजेश द. मेहेत्रे, मा. केशवराव सोनुने, अमरावती विभागाध्यक्ष मा. शरदजी बनकर, अमरावती विभाग उपाध्यक्ष मा. राजेंद्रकुमार पल्हाडे, मा. ओम गोरडे तसेच जिल्हाध्यक्ष (घाटावरील) मा. विजय राजाभाऊ खरात यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मराठवाड्यात अखिल भारतीय माळी महासंघाची संघटनात्मक ताकद झपाट्याने वाढत असल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होत असून, समाजहिताच्या लढ्याला यामुळे अधिक बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
✍️ संपादकीय संदेश
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 ७३८७३७७८०१ हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
📰 बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राइब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा.
📲 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुप फॉलो करायला विसरू नका.
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीTV #अखिलभारतीयमाळीमहासंघ #डॉरमेशमोठे #जाफ्राबाद #जालना #OBC #जातनिहायजनगणना #संघटनविस्तार #माळीसमाज #शंकररावलिंगे





