महात्मा फुलेंच्या तत्वांचा बराच सार भारतीय संविधानात पाहायला मिळतो.

महात्मा फुलेंच्या तत्वांचा बराच सार भारतीय संविधानात पाहायला मिळतो.
– व्याख्याते परमेश्वर बनकर,बीड 9503288282
महात्मा फुलेंचे तत्वज्ञान,समता,स्वातंत्र्य,न्याय बंधुते बद्दलचा त्यांचा विचार,अस्पृश्य निर्मूलन,जातीभेदा संदर्भातील त्यांच योगदान,प्राथमिक शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत,शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या संदर्भात कायदे करण्यात यावेत म्हणून इंग्रज सरकारकडे त्यांनी केलेल्या मागण्या,विधवा महिला,स्त्री शिक्षण,स्त्री संरक्षणा बद्दल चे त्यांचे मत,बालकामगारांनी कामा पेक्षा शिक्षणाला महत्व द्यावं या संदर्भातली त्यांची भूमिका, या सर्व गोष्टींच वाचन केल्यास आणि भारतीय संविधानाच वाचन केल्यास भारतीय संविधानात महात्मा फुलेंच्या तत्वांचा बराच सार दिसतो. त्या संदर्भात खालील मुद्दावरून आपल्याला स्पष्ट करता येईल.
1789 च्या फ्रेंच राज्य क्रांतीनंतर जगभर समता स्वातंत्र्य व बंधूतेचे वारे वाहू लागले,19 व्या शतकाच्या मध्यार्धात महाराष्ट्रामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या या तत्वांचा पुरस्कार सर्वप्रथम कोणी केला असेल तर तो म्हणजे महात्मा जोतीराव फुले यांनी. महात्मा फुलेंच्या साहित्यात सामाजिक समतेचा व्यापक अश्या पद्धतीचा संदेश आपल्याला पहायला मिळतो, कोणताही माणूस हा त्याच्या जातीने नव्हे तर तो त्याच्या कार्याने श्रेष्ठ ठरतो हा विचार त्या काळी महात्मा फुलेंनी मांडला होता, शिक्षण हे केवळ एका जाती पुरतेच नव्हे तर ते प्रत्येक घटकाला मिळाले पाहिजे हा शैक्षणिक समानतेचा संदेश महात्मा फुलेंच्या साहित्यात पहायला मिळतो. स्त्री पुरुष समानता या बद्दल महात्मा फुलेंनी साहित्यातुन आणि कृतीतुन खूप मोठा संदेश बहुजन समाजाला दिलेला आहे. स्त्रियांना ही मानवतेचे अधिकार मिळावेत, शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्रात क्रांती घडवून आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे.
1882 साली हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं हे मागणी करणारे महात्मा फुले आशिया खंडातील पहिले व्यक्ती ठरतात, आज भारतीय संविधान कलम 21 A नुसार प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केललं आहे.
अस्पृश्यता निर्मूलनासाठी महात्मा फुलेंनी उभा केलेली चळवळ, अस्पृश्यांसाठी स्वतः च्या घरातील खुली केलेली पाण्याची विहीर, अस्पृश्यांसाठी स्थापन केलेल्या शाळा, या मधून महात्मा फुलेंचं अस्पृश्यता निर्मूलनाच कार्य स्पष्ट होतं. आज भारतीय संविधानात कलम 17 नुसार अस्पृश्य पाळण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.
धर्म भेद पंथ मानवा नसावे! सत्याने वर्तावे इषासाठी !!
जात धर्म पंथ यावरून माणसाने भेदभाव करू नये असं महात्मा फुलेंनी शेकडो वर्ष पहिलेच सांगितलं होतं, आज भारतीय संविधान कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर माणसा माणसामध्ये भेदभाव करण्यास प्रतिबंध घातलेला आहे.
हंटर कमिशन समोर मागणी करताना प्राथमिक शाळेतील शिक्षक हे शेतकरी वर्गातील व बहुजन वर्गातील सुद्धा असावेत म्हणजे त्यांना रोजगार मिळेल आणि बहुजनांच्या मुलांना ते चांगलं शिकवतील ही मागणी महात्मा फुलेंनी त्या काळी केली होती, आज भारतीय संविधान कलम 16 नुसार सर्वांनाच सरकारी नौकरी मध्ये समान संधी आहे.
भारतीय संविधानाने कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याचे अधिकार बहाल केलेले आहेत, माणसाला स्वातंत्र्य असणं हे खूप जरुरिच आहे हे महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. तसेच त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माच्या नियमामध्ये स्वातंत्र्या बद्दलचे आणि हक्क अधिकाराबद्दलचे विचार पहायला मिळतात.
हंटर कमिशन समोर साक्ष देताना महात्मा फुलेंनी आदीवासी जाती जमातीना शिक्षणात प्राधान्य देण्याची सुद्धा मागणी केली होती, आज भारतीय संविधानातील कलम 15 (4) मध्येअनुसूचित जाती जमाती साठीची तरतुद आपल्याला पहायला मिळते. कलम 15(3) नुसार महिला व बालकांसाठी विशेष तरतुद पहायला मिळते. समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या संदर्भात तर महात्मा फुलेंच्या प्रत्येक ग्रंथात उल्लेख आहे त्यामुळे त्या बद्दल विशेष लिहिण्याची गरज नाही.
महात्मा फुलेंचे साहित्य वाचल्यास भारतीय संविधाना मध्ये त्यांच्या तत्वांचा बराच सार आहे याची जाणीव आपल्याला होते आणि महात्मा फुलेंच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेची प्रचिती येते. जय जोती जय क्रांती… शिवक्रांती टीव्ही न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा

