दहशतवादाविरोधात केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

दहशतवादाविरोधात केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.
यावेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
जनतेला केंद्र सरकारला सांगावं लागतंय की काहीतरी कारवाई करा. अनेक हल्ले झाले, अनेकजण दगावले पण, दहशतवाद काही थांबत नाही. केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही, केंद्र सरकारने प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, अशी जनभावना आहे.
पंतप्रधानांनी तिन्ही लष्करप्रमुखांना बोलावून चर्चा केली, मात्र भाजप पक्ष स्तरावर किंवा केंद्र सरकारने कॅबिनेट स्तरावर कोणतीही बैठक घेतली नाही. वर्तमानपत्रांतून केवळ एवढेच समजले की, लष्कराला ‘हवी तशी कारवाई करा’ असे सांगण्यात आले. पण, कोणतीही कारवाई ठराविक प्रक्रिया आणि निर्णयातूनच होते.
इंदिरा गांधीं पंतप्रधान असताना १९७१ मध्ये
जेव्हा चार कोटी निर्वासित बांगलादेशी भारतात आले, तेव्हा भारताचे धान्यांचे गोडाऊन रिकामे झाले होते. इंदिरा गांधींनी जगासमोर ही स्थिती मांडली. अखेर जगाने ठामपणे सांगितले की, हा प्रश्न तुम्ही सोडवा. त्यातूनच बांगलादेश निर्माण झाला. ही संधी त्यांनी ओळखली. आज अशीच ऐतिहासिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे, केंद्र सरकारने कच खाऊ नये.
जर युद्ध खर्चिक बाब आहे, असे केंद्र सरकार म्हणत असेल, तर आम्ही विचारतो की, तुम्ही ६३ हजार कोटींचे राफेल विमाने घेतले, जी २०३० ला भारतात येणार आहेत. त्याऐवजी तो पैसा आजच्या कारवाईसाठी वापरावा. लोकं सरकारसोबत उभे राहतील. सरकारने एक पाऊल टाकावे, लोकं दोन पाऊल टाकतील.
जग पाकिस्तानकडे एक आतंकवादी देश म्हणून पाहत आहे. आज निर्णय घेऊन मोदींनी इतिहासात आपले नाव अजरामर करण्याची संधी साधावी. लष्कर सज्ज आहे पण, निर्णय घेणारी कॅबिनेटची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे. दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकर आलिंगी 73 87 37 78 01
#Pahalgam #PahalgamTerrorAttack


