सोशलटॉप न्यूज

महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘ फुले ‘ चित्रपट ,चित्रपट गृहात दाखवा अन्यथा आंदोलन करण्याची नागरिकांची मागणी

महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित

‘ फुले ‘ चित्रपट ,चित्रपट गृहात दाखवा अन्यथा आंदोलन करण्याची नागरिकांची मागणी

महात्मा जोतीराव फुले यांना सामाजिक कार्यात विरोध झाला. आज सुद्धा त्यांच्या कार्याला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.परंतु जो इतिहास आहे तो पुसल्या जाणार नाही.विरोध करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यायला पाहिजे व विरोध बंद केला पाहिजे—
सुनयना संजय येवतकर( अजात) महिला जिल्हाध्यक्ष अ. भा. महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यवतमाळ

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटाची निर्मिती करण्यात येऊन दिनांक २५ एप्रिलला चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला, परंतु यवतमाळ मध्ये या चित्रपटाचे चित्रपटगृहात प्रदर्शन झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये झालेल्या रोशाबद्दल नागरिकांनी आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देऊन चित्रपटगृहात फुले चित्रपट क्राइम टाइम मध्ये दाखवण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केल्या जाईल तेव्हा फुले चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यवतमाळ च्या वतीने करण्यात आली.फुले चित्रपटाला संपूर्ण भारतात प्रदर्शन करण्यात आले.

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचे मोठे सामाजिक योगदान आहे परंतु काही समाजकंटक या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. तेव्हा शासनाने यात हस्तक्षेप करावा अशी विनंती निवेदनातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुनयना संजय येवतकर , इंजिनीयर अशोकराव तिखे, उत्तमराव खंदारे , दीपक वाघ , मनोज पाचघरे , सुरेश तिरसंगे पाटील , संजय येवतकर, सुधाताई खडके,

ललिता वाघ,अबोली देशमुख, शशांक केंडे, शितल घावडे ,कांता लाहे , विवेक घावडे, संध्या पानखडे रंजना आडे, सपना घावडे ,सीमा ठोकळ ,विद्या भोयर, करुणा भबुतकर मनोज भबूतकर ,आशिष तांदळे ,हर्षल फुलझेले, सिद्धांत खोब्रागडे ,सौरभ भागवत, हर्षदीप पाटील, सुरज खंडाळे, प्रशिक मुन ,रितिक बेताल, अजय भगत, सुरेश पाटील, मयूर बेलखेडे, अजय भगत ,विकी मेश्राम, आयुष वासनिक, अविनाश वाघमारे, आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोकराव उइके शासकीय विश्रामगृहा मध्ये भेट घेऊन सुनयना संजय यवतकर (अजात)यांनी सर्व विषय त्यांना सांगितल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य हे सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी त्यांनी एम एच 29 या चित्रपट गृह मालकाशी बोलून अजून पर्यंत चित्रपट यवतमाळ मध्ये का दाखवला गेला नाही याची माहिती घेतली व स्वतः पहिला शो त्यांनी स्वतः खर्च करून सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्व फुले प्रेमींना दिले. यावेळी चित्रपटगृह मालकाने सांगितले की शुक्रवारी दि 02/05/25 पासून हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित केल्या जाईल. दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 k

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button