राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र उत्सव उपक्रमांतर्गत आज नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र उत्सव उपक्रमांतर्गत आज नाशिकमधील हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम पार पडला. राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री मा. नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी हुतात्म्यांचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच लोकशाहीर वामनदादा कर्डक, साहित्यिक बाबुराव बागुल, ज्ञानपीठकार वि. वा. शिरवाडकर, समाजसुधारक दादासाहेब गायकवाड, स्वातंत्र्यसेनानी वसंत हुदलीकर यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला.
आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्यातील महत्वाची पवित्र ठिकाणे तसेच या देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत या ठिकाणची माती आणि पाणी मंगल कलशातून संकलित करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्याचा इतिहास सर्व समाजासमोर मांडला जात आहे. राज्यात आणि देशात एकतेची भावना निर्माण करण्यास ही यात्रा अतिशय महत्वाची आहे.
महाराष्ट्राला सहज कुठलीही गोष्ट मिळालेली नाही. १०६ हुतात्म्यांचे योगदान आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे. गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव करावारचा लढा सुरू आहे. आपला हा महाराष्ट्र संपूर्ण देशाचा महत्वाचा कणा आहे. देशात सध्या युद्धाचे सावट आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्याचा वाटा हा अधिक मोलाचा वाटा राहील, त्यामुळे सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील सहा विभागांतून मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नाशिक शहरात दाखल झाली. त्यानंतर रामशेज किल्ला, बोधिवृक्ष, स्व. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक नोट प्रेस, कुसुमाग्रज स्मारकातील मंगल कलशाने आडगाव येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. यानंतर काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्यांच्या वारसाचा सत्कार हुतात्मा स्मारक, नाशिक येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विभागात मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. त्या सर्व मुंबईतील जांबोरी मैदानावर महाराष्ट्र दिनी दि. १ मे रोजी एकत्रित येणार आहे. १ ते ४ मे असा चार दिवसाचा “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, महाराष्ट्राची यशोगाथा, आर्ट कॅम्प, चित्रकार कलाकृती दालन असे विविध दालनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन घडविण्यात येत आहे.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी प्रशांत कदम, रवींद्र पाटील, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, गौरव गोवर्धने, चेतन कासव, समाधान जेजुरकर, ॲड. चिन्मय गाढे, जगदीश पवार, प्रसाद सोनवणे, संजय खैरनार, नितीन चंद्रमोरे, जीवन रायते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sameer Bhujbal Narhari Zirwal Pankaj Bhujbal
#mangalkalash #Maharashtra #nashik #yeola

