जरासंधाला आवरा

जरासंधाला आवरा. या जरासंधला वेळीच आवरणे गरजेचे आहे अन्यथा हा सर्वानाच त्रासाचा आहे.याचा वेळीच बंदोबस्त केला नाहीतर तो ओबीसी ना तर त्रासदायक होणारच आहे पण मराठा समाज आणि राजकीय पुढारी यांनाही तो अडचणीचा होणार आहे.मराठा पुढाऱ्यांना आज गुदगुल्या होत आहेत पण हे दुधारी शस्त्र मराठा पुढाऱ्यांच्या आधाराने मोठं झालंय ते त्यांच्याही नाशास कारणीभूत ठरणार आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून माराठेतर बहुजनांवर दहशत माजवन्याचा जो प्रयत्न झाला ते सर्वच मराठा पुढाऱ्यांच्या साहाय्याने झाला आणि हा जरासंध आता चांगलाच प्रबळ होत चालला आहे.
त्याचे लाड सुरवातीला मराठा पुढाऱ्यांनी केले नंतर शासन करत आहे आणि त्यामुळे त्याची भाषा अरेरावीची झाली आहे.प्रथम भुजबळ साहेबाना बोलत होता नंतर तो इतरही पुढाऱ्यांना बोलू लागला आहे.तो कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत आहे.. भुजबळ साहेबांनी आता 12 ते 15 टक्के वाढवून आरक्षण घेवू आणि ते मराठा समाजास द्यायला हरकत नाही आणि हा खर तर खूपच योग्य तोडगा आहे परंतु तो या जरासंधला मान्य नाही.तो म्हणतो आरक्षण हे ओबीसी मधूनच हवे. याचा अर्थ त्याला मराठा समाजाचे भले करायचे नसून मराठा पुढाऱ्यांना ओबीसी आरक्षणातून राजकीय मलिदा हवा आहे.
ज्या ओबीसी ना कधीही न मिळालेली राजकीय पदे या मंडल आयोगाच्या अंमल बजावणी पासून मिळू लागली ती ह्या सरंजामशहाणा खुपू लागली आणि हा जरासंध हा सर्व सामान्य मराठा लेकरांचं नाव घेवून ह्या धन दांडग्या मराठा पुढारी लोकांसाठी काम करत आहे.हे सुध्धा ज्यावेळी मराठा तरुणांच्या लक्षात येईल तो पर्यंत समाजा समाजा मध्ये दुफळी निर्माण होणार आहे ती भरून यायला खूप दिवस जाणार आहेत किंबहुना यात समस्त बहुजनांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे.
म्हणून पडद्यामागून राज कारण खेळणारा हा जरासंध वेळीच संपवायला हवा किंबहुना सर्वच थरातून त्याच्या या अमानवी कृत्यांचा निषेध होणे गरजेचे आहे.माळी समाज याला विरोध करत आहेच परंतु इतर ओबीसी घटकातून जेव्हढा विरोध व्ह्यायला हवा तेवढा होताना दिसत नाही. तेव्हा सकल मराठा तरुण आणि ओबीसी समाज बांधवांनो त्याच बरोबर शासन कर्त्यानो ह्या जरासंधाची चाल वेळीच ओळखा आणि त्याला आवर घाला. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




