सत्यशोधकीय दशपिंडी दशक्रिया विधी व स्मृती वृक्ष लागवड

*सत्यशोधकीय दशपिंडी दशक्रिया विधी व स्मृती वृक्ष लागवड*🌳🌳 *राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष व अ भा मा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकररावजी लिंगे साहेब यांचे उपस्थित केशर या जातीच्या आंब्याचे स्मृती वृक्ष म्हणून रोपणाचा कार्यक्रम झाला
श्रीगोंदा तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासंघाचे. जिल्हाध्यक्ष माननीय निवृत्ती तुकाराम शेलार सर यांच्या मातोश्रीं निसर्ग विलीन श्रीमती कृष्णाबाई तुकाराम शेलार वय वर्ष 87 🙏🏻 यांचे 31 /10/ 2023 रोजी निसर्गात विलीन झाल्या** वडिलांकडे नाव कृष्णाबाई सुंदराबाई सहादू रायकर हंगेवाडी यांच्या त्या कन्या होय. त्यांचा अंत्यविधी त्यांचे घरासमोर शेतात करण्यात आला*
दिनांक 1/ 11 /2023 रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या घरासमोर अस्थी रक्षा सावरण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी अस्थिरक्षा घरासमोरील समोरील प्रांगणामध्ये खड्डे खोदून आंब्याचे🌳 स्मृती रुक्ष लागवड केली त्यावेळी गावातील तसेच पै पाहुणे सर्व हजर होते हा उपक्रम स्तुत्य असून याची भविष्यात गरज आहे
कारण अशा स्तुत्य उपक्रमामुळे आपल्या पूर्वजांच्या अस्थिरक्षा कुठेही सध्या कारखानदारीच्या प्रदूषित पाण्यामध्ये न टाकता आपल्याच शेतामध्ये घरासमोर ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आनंददायी अशा घरासमोर त्याच्या पावन भूमीत झालेला असतं त्यामुळे शेवट कुठल्याही नदीमध्ये टाकले तरी त्या अस्थिरक्षाची विटंबनाच होते सरपंच उपसरपंच सदस्य उमेदवार हजर होते हजर असलेल्या बहुतेक सर्वांनाच हा उपक्रम अगदी स्तुत्य वाटला आणि त्याची भरभरून स्तुती करून यापुढे अशा प्रकारेच आपण सत्यशोधकीय उपक्रम हाती घेऊन हे कार्य पुढे नेऊया अशी भावना व्यक्त केल्या होत्या
त्याचप्रमाणे दिनांक 9 /11 /2023 रोजी लोणी व्यंकनाथ येथे दशक्रिया घाटावरती त्यांचा सत्यशोधकीय दशक्रिया विधी संपन्न झाला यावेळी उपस्थितांना माननीय शंकररावजी लिंगे यांनी सत्यशोधकीय चळवळ आणि सत्यशोधक विधी बहुजन समाजांनी का कराव्यात आणि यातून ओबीसींनी काय संदेश घ्यावा यावरती प्रबोधन केले सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सत्यशोधक विधी चे मार्गदर्शन केले गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत नवनिर्वाचित सर्व सदस्य समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय डाके जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार व्याख्याते प्रशांतजी खामकर रयत शिक्षण संस्था सत्यशोधक अशोक दरोडे सौ सुनीता दरोडे नामदेवराव साबळे सर कोरडे सर गंगाराम कोकाटे सुनील सुनील कोकाटे पांडुरंग राऊत दूध डेरी चेअरमन एडवोकेट महेंद्र शिंदे पत्रकार काकडे साहेब बी आर एस पक्षाचे अध्यक्ष घनश्याम शेलार विविध संस्थांमधील अध्यक्ष उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष उद्योजक सर्व हजर होते
रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी पदाधिकारी सातारहून आलेले शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ
मातोश्री कृष्णाबाई तुकाराम शेलार यांच्या पाठीमागे फार मोठा परिवार आहे पैकी बहुतेक सर्वच शिक्षण व वैद्यकीय आणि शासकीय सेवेत कार्यरत आहेत
श्री निवृत्ती शेलार मुलगा
श्री मारुती शेलार मुलगा
सौ सिंधुताई रसाळ मुलगी
सौ इंदुबाई रायकर मुलगी
सौ सीताबाई खामकर मुलगी
सौ संगीता इधाटे मुलगी
कु प्रसाद शेलार नातू
कु डॉ ओंकार शेलार नातू असा आणखी मोठा परिवार असून
कु डॉक्टर वैष्णवी मारुती शेलार नात
*मातोश्री कृष्णाबाई तुकाराम शेलार यांचा दशक्रिया विधी दिनांक 9/ 11 /20 23 रोजी आठ वाजता मुक्काम लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे दशपिंडी दशक्रिया महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाज नुसार संपन्न झाला* विनित श्री निवृत्ती तुकाराम शेलार श्री मारुती तुकाराम शेलार 9960085737
✒️सत्यशोधक भिमराव कोथिंबिरे 9421690800
🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक जय भीम जय भारत जय शिवराय सत्यमेव जयते सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻




