सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 81

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
81

यांच्याकडून इ. स. १९९१ साली डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय झाला. मात्र, रा. ना. चव्हाणांना ही पदवी प्रत्यक्षात विद्यापीठाकडून दिली गेली नाही. ‘दीनबंधु’, ‘सुबोधपत्रिका’, ‘राष्ट्रवीर’, ‘विजयी मराठा’, ‘लोकमित्र’, ‘लोकराज्य’, ‘संग्राम’, ‘समाज प्रचोधन’, ‘नवभारत’, ‘अस्मितादर्श’, ‘पुरोगामी सत्यशोधक’, ‘मराठा’, ‘जागृती’ आदी नियतकालिके आणि अनेक मान्यवर दैनिकांच्या दिवाळी अंकांमधून त्यांनी विपुल लेखन केले. सुलभ संस्कार लग्नविधी’ (१९४६), ‘सार्वजनिक सत्यधर्म प्रसार’ ( १९४६),

. ‘सत्यशोधक जोतिराव फुले’ (१९५२), ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या काही आठवणी’ (१९७५), ‘महाराष्ट्र आणि मराठे’ आदी मौलिक ग्रंथांचे लेखन रा.नां.नी केले. तसेच ‘रा. ना. चव्हाण निवडक वाङ्मय’ (१९८६) संपादक – मो. नि. ठोके, रा. ना. चव्हाण विचारदर्शन (१९८७) संपादक शरदचंद्र चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील शोध आणि बोध (१९८७) संपादक मो. नि. ठोके आदी संसदकांनी त्यांच्या साहित्याचे संपादन केले आहे. या व्यतिरिक्त रा. ना. चव्हाणांचे • वाड्मय त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण व रा.नां.ची सून वैशाली चव्हाण रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या विद्यमाने टप्प्याटप्प्याने प्रकाशित करीत आहेत.

शब्द मोजके, सरळ, आशयपूर्ण आणि छोटी-छोटी वाक्ये हे ‘रा. नां. ‘च्या

लेखणीचे धन होय. अतिरेकी शब्दांना थारा न देता, संयमी शब्दांवर हुकमत

गाजवून आशययुक्त लेखन करणे हे ‘रा.नां. ‘च्या लेखणीचे सामर्थ्य होय. सामाजिक- पुरोगामी चळवळीची भली थोरली वाङ्मयीन बखर लिहिणारा हा बहुजन लेखक तसा बहुजन समाज आणि सरकार दरबारी उपेक्षितच राहिला! हयातभर इहवादाशी नाळ जोडून आणि सत्याची कास न सोडणाऱ्या या सत्यशोधक लेखक, विचारवंताचे दिनांक १० एप्रिल १९९३ रोजी पुणे येथील रत्ना रुग्णालयात वयाच्या ७९ व्या वर्षी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. संदर्भ-

१. परिवर्तनाची क्षितिजे – संपादक डॉ. एस. एस. भोसले, २. पुरोगामी सत्यशोधक अंक (जा. फे. मार्च १९९३) कार्यकारी संपादक- डॉ. बाबा आढाव, ३. महात्मा फुले यांचे ‘नवदर्शन’ एक तौलनिक अभ्यास – संपादक- रमेश चव्हाण

चव्हाण हरिभाऊ लक्ष्मण
(जन्म ९ एप्रिल १९३६)

हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण हे परळी वैजिनाथ, जिल्हा बीड येथील रहिवासी असून ते बीड जिल्हा सत्यशोधक शाखेचे उपाध्यक्ष आहेत. हरिभाऊ चव्हाण हे सेवानिवृत्त शिक्षक असून अधूनमधून लेखन करीत असतात. ‘गीता-सत्यदर्शन’ हा त्यांचा वैदिक परंपरेला छेद देणारा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांनी आपल्या कनिष्ठ मुलाचे-यशवंतचे लग्न सत्यशोधक विवाहमते मंगळवार, दिनांक ११ डिसेंबर २००१ रोजी लावले.

गणपतराव बळवतराव
चव्हाण
(सुमारे जन्म १९१०-मृत्यू डिसेंबर १९४७)

गणपतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे थोरले साहेब तथा देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू असून, त्यांचा जन्म सुमारे १९१० सालचा असावा. वडील बळवंतरावांच्या निधनानंतर (१९१७) आई विठाईसह चव्हाण परिवार कराड येथील डुबल आळीत वास्तव्यास आला. या समयास याच आळीत एक ज्येष्ठ सत्यशोधक भाऊसाहेब कळंबे सत्यशोधक चळवळीत कार्यरत होते. ते ‘शिक्षकाचा कैवारी’ पत्र या सुमारास कराड येथून प्रसिद्ध करीत असत. साहजिकच या चळवळीकडे गणपतराव चव्हाण आकर्षित झाले. डुबल आळीतील बाळनाथबुवांचा मठ हा सत्यशोधकी कार्याचा केंद्रबिंदू होता. या मठात गणपतरावांवर कुमार वयातच सत्यशोधकी संस्कार झाले. पुढे एक वाडा भाड्याने घेऊन भाऊसाहेब कळंबे यांनी ‘विजयाश्रम’ बालविला. या ‘विजयाश्रमा’चे गणपतराव चव्हाण हे क्रियाशील सदस्य होते. याचदरम्यान कुमार यशवंतराव, गणपतरावांना सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button