🌹 मा. खासदार व आमदारांना युवक-युवती परिचय संमेलन स्मरणिका भेट 🌹

🌹 मा. खासदार व आमदारांना युवक-युवती परिचय संमेलन स्मरणिका भेट 🌹
मुंबई : महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने माजी खासदार यांची त्यांच्या मुंबईतील आमदार निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दिल्ली येथे आयोजित युवक-युवती परिचय संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेली विशेष स्मरणिका त्यांना भेट देण्यात आली. या विशेष अंकात स्मरणिकेत वधू-वरांचा परिचय देशातील मान्यवर सामाजिक राजकीय शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नावे पत्ते फोन नंबर अशी विविध माहिती देण्यात आलेली आहे
तसेच (चंदूभाऊ), आमदार मोर्शी-वरुड, जिल्हा अमरावती यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन स्मरणिका प्रदान करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिरुळकर हे उपस्थित होते
या प्रसंगी बुलढाणा येथील समाजसेवक रमेश हिराळकर हेही उपस्थित होते. मान्यवरांनी दिल्लीतून प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचे कौतुक करत संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्याची प्रशंसा केली.
महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम गहलोत, वरिष्ठ उपाध्यक्ष रामलाल कच्छावा, रामनारायण चौहान, महासचिव आर. पी. सैनी, कोषाध्यक्ष जी. एल. सैनी तसेच संयुक्त सचिव ॲड. अनुभव चंदेल यांनी सर्वांचे आभार मानले.
✨ शिक्षण, समाजजागृती आणि सामाजिक एकात्मतेसाठी सुरू असलेल्या या कार्याला अधिक बळ मिळो, हीच सदिच्छा! ✨
📰 दीनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801
👉 हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका
#महात्माफुले #शंकररावलिंगे #युवकयुवतीपरिचयसम्मेलन #सामाजिककार्य #शिक्षण #समाजजागृती #माळीसमाज #दिल्लीस्मरणिका #DinbandhuNews #SevakKrantiTV #SocialAwareness #MahatmaPhule




