सोशल

सोलापूर बालरोग संघटना शाखा, (कॉन्फरन्स) शोधनिबंध चर्चासत्र

न्यूज
11-07-2024

सोलापूर बालरोग संघटना शाखा, (कॉन्फरन्स) शोधनिबंध चर्चासत्र

 

अखिल भारतीय बालरोग संघटना (अतिदक्षता विभाग) महाराष्ट्र शाखा व सोलापूर बालरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२, १३, १४ जुलै २०२४ रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे ९ व्या राज्यस्तरीय कार्यशाळा व चर्चा सत्राचे नियोजन करण्यात आले
आहे. दि १२/०७/२४ रोजी बेसिक व्हेंटिलेशन, ऑक्सिजन पुरवठा तंत्र, अतिदक्षता विभागातील सोनोग्राफी व नर्सिंग स्टाफसाठी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.

दि. १३.१४ जुलै रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध विषयातील तज्ञ लहान मुलांमधील अतिदक्षता विभागातील जंतुसंसर्ग, कृत्रिम श्वासोश्वास, मेंदूज्वर, अपस्मार, सर्पदंश अशा विषयी व्याख्याने होणार असून प्रामुख्याने अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बसवराज सहअध्यक्ष, डॉ. अतुल कुलकर्णी सचिव, डॉ. योगेश पारिख, डॉ. खळतकर, अतिदक्षता विभागाचे अध्यक्ष डॉ. मनीष शर्मा सचिव, डॉ. विनायक पत्की, डॉ. घोरपडे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष, डॉ. छाजेरिया सचिव डॉ. अमोल पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कार्यशाळा व चर्चा सत्राचे नियोजन करण्यासाठी सोलापूर बालरोग तज्ञ संघटनेचे व कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. सुनील वैद्य संयोजक डॉ. दयानंद नकाते डॉ. आण्णासाहेब लोखंडे व सचिव डॉ. समीर खान, डॉ. कुंदन चोपडे, डॉ. केयूर शिरशी व डॉ. विक्रम हिरेकेरुर व इतर सर्व बालरोग तज्ञानी अथक परिश्रम घेतले असून यासाठी सोलापूर शहर व इतर ९, १० जिल्ह्यातील साधारणतः २५० ते ३०० बालरोग तज्ञ उपस्थित राहणार असून या कार्यशाळेचा अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या बालरोग तज्ञांना याचा लाभ होणार आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button