मंडलनामा क्रमशः 9. कपिल पाटलांनी रुजवले बीज

मंडलनामा क्रमशः
9. कपिल पाटलांनी रुजवले बीज
असेच काही महिने गेल्यानंतर जनार्दन पाटील यांच्याकडे सतत येणाऱ्या कपिल पाटील या तरुण पत्रकाराची ओळख झाली. हा पत्रकार हरहुन्नरी होता. तीक्ष्ण बुद्धी व अभ्यासू तर्क ही त्यांची पुंजी. ते राष्ट्र सेवा दल या समाजवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून मला समाजवाद, काँग्रेसचा मध्यममार्ग, हिंदुत्ववाद, कट्टर मुसलमान, कम्युनिस्ट आदी विचारधारांची सर्व भेदांसह माहिती होत गेली. ते माझ्याहून अंदाजे पंधरा वर्षे लहान असले तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. एके दिवशी जनार्दन पाटील यांच्याकडे गप्पा मारत बसलो असताना कपिल पाटील तेथे आले. आम्ही तिघेच होतो.
मी आता जनार्दन पाटील यांच्या सहवासाने ओबीसी संघटनेतील सक्रिय कार्यकर्ता झालो होतो. त्या दिवशी कपिल पाटील यांनी मला मुस्लिम ओबीसींसाठी काम करावे, असे सुचवले. ‘मुसलमानांतील कोणीच या ओबीसींसाठी बोलत नाही. त्यांची आर्थिक, समाजिक, शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी चळवळ केली पाहिजे’, असे कपिल पाटील सांगत होते. कपिल पाटील भेटतील तेव्हा माझ्याकडे हा मुद्दा काढायचे. मी व ते यावर चर्चा करायचो. ते वयाने लहान असले तरी त्यांचा मुंबईत तेव्हाही दांडगा संपर्क होता.
शिवाय मंत्रालयातील पत्रकार असल्याने राजकीय नेते व मंत्र्यांच्याही ओळखी होत्या. त्यांचा मुसलमानांबद्दलचा सामाजिक व शैक्षणिक अभ्यास माझ्यापेक्षा जास्त होता. मुसलमानांमध्ये सामाजिक व शैक्षणिक चळवळ सुरू केल्याशिवाय गरीब मुसलमानांच्या जीवनमानात फरक पडणार नाही, असे त्यांनी मला सांगितले, नव्हे पटवूनच दिले. जनार्दन पाटीलही या गप्पा ऐकत असत.
त्यांचाही कपिल पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा होता. जनार्दन पाटलांमुळे
मी ओबीसी चळवळीत आलो तर, कपिल पाटील
यांच्यामुळे माझ्या कार्याला दिशा मिळाली.
मुसलमानांतील ओबीसींमध्ये कोणीच सामाजिक काम करत नाही; ही जबाबदारी मी घेतली पाहिजे, हे कपिल पाटील यांनी मला पक्के पटवून दिले. मी आयुष्यभर मुस्लिमांतील ओबींसाठीच काम करणार, असा निर्णय पक्का केला. कपिल पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चामधूनच माझा मंडल आयोगाचा अभ्यास पक्का झाला. आयोगाच्या मांडणीत कोठेही जात हा शब्द नसून वर्ग हा शब्द असल्याचे माझ्या लक्षात आले.
गरीब मुसलमानांच्या जीवनात सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी चळवळ हा मार्ग असल्याचे मला पटले. तेथेच मुस्लिम ओबीसी संघटनेचे बीज माझ्या मनात पेरले गेले. कपिल पाटील आता आमदार आहेत. ते मुंबई शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




