महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची IIT बॉम्बेवर मोठी कारवाई; FSSAI परवान्याशिवाय सुरू असलेली 2 कँटीन तात्काळ बंद

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली IIT बॉम्बे (पवई) कॅम्पसमधील दोन कँटीनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान या कँटीन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळून आल्याने त्यांना तात्काळ स्टॉप बिझनेस नोटीस बजावण्यात आली.

IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये FDA ची धडक कारवाई

अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र FDA ने IIT बॉम्बेच्या पवई कॅम्पसमधील वसतिगृह मेस आणि कँटीनची तपासणी केली. या तपासणीत दोन कँटीन आवश्यक FSSAI परवान्याशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित कँटीनना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.


कोणत्या कारणामुळे कारवाई?

FDA अधिकाऱ्यांच्या तपासणीत हॉस्टेल क्रमांक 1 आणि हॉस्टेल क्रमांक 3 मधील कँटीनकडे वैध FSSAI परवाना नसल्याचे आढळले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार परवान्याशिवाय अन्न व्यवसाय चालवणे नियमबाह्य असल्याने दोन्ही कँटीनना स्टॉप बिझनेस नोटीस देण्यात आली.


तिसऱ्या कँटीनला सुधारणा नोटीस

तपासणीदरम्यान हॉस्टेल क्रमांक 12, 13 आणि 14 साठी सेवा देणाऱ्या एका कॅटरिंग ऑपरेटरकडे वैध परवाना असला तरी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांमध्ये काही त्रुटी आढळल्या.

त्यामुळे संबंधित संस्थेला सुधारणा (Improvement Notice) नोटीस बजावून आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या सुविधांवरही चर्चा

तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांनी कँटीन बंद झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला.

यावर FDA अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये FSSAI परवानाधारक अनेक खाद्य आस्थापने उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच आवश्यक परवाने मिळवून नियमांचे पालन केल्यानंतर संबंधित कँटीन पुन्हा सुरू करता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले.


राज्यभर सुरू आहे विशेष मोहीम

तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मेस, क्लाऊड किचन आणि शैक्षणिक संस्थांतील अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे.

या मोहिमेचा उद्देश अन्न सुरक्षा नियमांचे पालन, आवश्यक परवाने आणि स्वच्छतेची खात्री करून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button