माननीय सर… आपले मत अत्यंत रास्त आहे…अगदी खरे….

माननीय सर…
आपले मत अत्यंत रास्त आहे…अगदी खरे….
सगळ्यांना हे मान्य पण आहे…
पण या निवडणुकीत एक ऊमेदवार देण्यात आला पाहिजे..
एकमुखी त्याला चालवावे..
बहुजन समाजातील नेत्यांनी वेगवेगळ्या ऊमेदवार घोषित करण्यापेक्षा एकत्रित पाठिंबा द्यावा असेही होऊ शकते…
ऊमेदवार जर पराभूत झाला तर हसु नक्कीच होणार नाही…असे वाटते…कारण इतक्या मोठ्या अवाढव्य निवडणुकींच्या ऊमेदवारीसाठी आपण कोणीही विचारच केला नव्हता…पण रिंगणात यावे लागेल…..
आधी पाय मग कळस हिच रित आहे….पण कळस लवकर आलाय पुढे निवडणूकीच्या रूपात तर सुरूवात इथुनच करून द्यावी… वेरूळ चे जगप्रसिद्ध कैलास मंदिर आधी कळस मग पाया असे साकारले आहे….
मोठ्या एकादशी ला पंढरपूर ला कळसच लांबुन पांडुरंगाचे दर्शन घडवतो…
जर एक समाज अपक्ष उमेदवार म्हणून दगडाला एकमुखी मतदान करणार असेल तर आपण ३७५ जातींचा मिळुन एकत्र आलेल्या समाज बांधवांनी जर ठरवले तर चतकोर जरी पक्ष , वैयक्तिक विरोध , नेत्यांना विरोध या प्रकारे विरोध गेले तरी बाकी नक्कीच एक होतील….आता असे झाले आहे … बर्याच जणांना विनाकारण ऊमेदवार व्हावस वाटतंय…असे झाले तर ते नक्कीच. हसु होण्याचे मुळ कारण ठरेल…जसे यल्गार मेळाव्यात सर्व संघटना, सर्व ओबीसी समाज, ओबीसी नेते एकत्र आले होते तसेच ऊमेदवार एक द्यावा …शेवटी चित्र स्पष्ट झाले की….
मला वाटते जागरूक ओबीसी समाज बांधवांची अशीच अपेक्षा असणार….
फक्त भुमिका
मीच…मीच…मीच…अशी नसावी ..
आपल्यातील कोणी ही
…… एकच.एकच.एकच…
अशी असावी..
डॉ.स्मिता तरटे.
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
💐🙏


