मंडलनामा क्रमशः 40.कार्यालयासाठी समाजाची साथ

मंडलनामा क्रमशः
40.कार्यालयासाठी समाजाची साथ
माझ्या कार्याला त्यावेळी मोठा विरोध असला तरी अनेक जण मदतीचा हात पुढे करत. मी राज्यभर मिळेल त्या वाहनाने दौरे करत असे. संघटनेच्या कामासाठी मला सतत मुंबईला जावे लागे. पण मुंबईत राहण्याची सोय नव्हती. अनेकजण तुमचे कार्यालय कोठे आहे?, असे विचारत. मला भेटण्यासाठी लोकांनी कोठे यायचे? या परिस्थितीत ‘डेली हिंदुस्थान’ या उर्दू दैनिकाचे मालक सरफराज आरजू यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी मौलाना आझाद रोड, नागपाडा येथील दैनिकाच्या कार्यालयात ‘टेबल स्पेस’ दिली. एक टेबल व एक खुर्ची माझ्यासाठी राखीव ठेवून तुमचे कार्यालय येथून चालवा, असे सांगितले.
त्यानंतर डॉ. खुर्शीद सिद्धिकी यांनी घाटकोपर येथे त्यांच्या घरी कार्यालयासाठी जागा दिली. सांताक्रुज यथेही एका हितचिंतकाने कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. मला मुंबईत पाय ठेवायला जागा नव्हती. पण समाजाने मला तीन ठिकाणी कार्यालयासाठी जागा दिल्या. मी सकाळ, दुपार व संध्याकाळ, अशी विभागणी करून तिन्ही कार्यालये चालवली. प्रोफेसर हाजी कलानिया यांनी मला नागपाडा जंक्शन जवळील त्यांच्या फ्लॅटची चावी दिली. त्यांच्यामुळे त्याकाळी मुंबईत राहण्याची सोय झाली. मी मिळेल त्या वाहनाने दौरे करत होतो. प्रचंड दगदग व्हायची व वेळही खूप जायचा. त्यामुळे कपिल पाटील यांनी त्यांच्या काही मित्रांकडून निधी जमवून १९९४ मध्ये मला एक मोटारगाडी घेऊन दिली. त्यामुळे संघटनेच्या कामाला वेग आला. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत संघटनेचे दोन आमदार निवडून आले. त्यांच्या मनोरा आमदार निवासातून काही काळ संघटनेचे कामकाज करण्यात आले. मुंबईत ‘टेबल स्पेस’ पद्धतीची तीन कार्यालये होती. पण सुसज्ज कार्यालय असावे, असे वाटायचे. मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन कार्यालयास जागा देण्याची विनंती केली. त्यांनी नरिमन पॉइंटची जागा सुचवली. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ पडेल अशी जागा मिळावी, असा माझा प्रयत्न राहिला. राज्य सरकारने २००१ मध्ये मुंबई सेंट्रलपासून जवळ आग्रीपाडा येथे संघटनेला कार्यालयासाठी जागा भाड्याने दिली. सध्या या जागेत संघटनेचे कार्यालय कार्यरत आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




