सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 69

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
69
गुप्ता शंकरलालजी रामदासजी
(१४ मे १९१६ – २५ एप्रिल २००६)
स्वातंत्र्यसेनानी शंकरलालजी रामदासजी गुप्ता हे देऊळगावराजा, जिल्हा बुलडाणा येथील सत्यशोधक होत. त्यांचा जन्म देऊळगावराजा येथे १४ मे १९१६ रोजी झाला. जेमतेम शिकलेले गुप्ता यांनी आरंभी चिखलीचे सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या सत्यशोधकी कार्यापासून प्रेरणा घेऊन देऊळगावराजा परिसरात सत्यशोधकी मताचा प्रचार आणि प्रसार केला. देऊळगावराजा येथील सत्यशोधक बंकटराव पाटील, भागोजीमामा दत्तवाल, अण्णाजी काळे आदी सत्यशोधकी मित्रांच्या सहकायर्यान या परिसरात सतत सत्यशोधक चळवळ कार्यरत ठेवली. अशा या सत्यशोधकाचे २५ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.
गुरनुले माधव तुळशीराम
(जन्म-२० ऑक्टो. १९६५)
प्रा. डॉ. माधव तुळशीराम गुरनुले हे चंद्रपूर येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९६५ रोजी झाला. डॉ. माधव गुरनुले हे उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून, ते पेशाने प्राध्यापक आहेत.
विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते डॉ. अशोक चोपडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून दिनांक २९ जून २००१ रोजी चंद्रपूर जिल्हा सत्यशोधक समाज कार्यकारिणी स्थापन केली. या नूतन कार्यकारिणीचे प्रा. डॉ. माधव गुरनुले हे कार्याध्यक्ष म्हणून निवडले गेले. या कार्यकारिणीत शाहेदा शेख यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. पुढे ३ जानेवारी २००४ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीदिनी जिल्हा पातळीवर शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला शाहेदा शेख आणि प्रा. विमल गाढेकर यांनी मार्गदर्शन केले, हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रा. गुरनुले यांनी परिश्रम घेतले. पुढे २५ डिसेंबर २००५ रोजी सत्यशोधक साहित्य आणि संस्कृती संशोधन परिषदेची चंद्रपूर येथे शाखा स्थापन
करण्यात गुरनुले यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, २००६ साली त्यांनी सत्यशोधक कार्यकर्त्यांचे शिबीर चंद्रपूर येथे आपल्या सत्यशोधकी सहकाऱ्यांसमवेत यशस्वी केले. औरंगाबाद, लातूर, सातारा, देऊळगावराजा, नागपूर येथे पार पडलेल्या सत्यशोधकी अधिवेशन आणि साहित्य संमेलनातील परिसंवादात त्यांचा सहभाग राहिला. सध्या ते सत्यशोधक समाजाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
गोरे
बाळाजी भीमाजी
(जन्म १-०७-१९३९)
बाळाजी भीमाजी गोरे हे ज्येष्ठ सत्यशोधक असून, ते देऊळगावराजा, जिल्हा बुलडाणा येथील सत्यशोधक आहेत. १ जुलै १९३९ साली जन्मलेले गोरे है पेशाने प्राथमिक शिक्षक होते. शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी देऊळगावराजा परिसरात सत्यशोधक चळवळ खळखळत ठेवली. देऊळगावराजा येथे भरलेल्या २४ व २५ डिसेंबर रोजीच्या चौथ्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाच्या आयोजन, नियोजनात त्यांचा सहभाग राहिला. ओतूर येथे भरलेल्या २००९ सालच्या जानेवारी महिन्यातील ३६ व्या सत्यशोधकी अधिवेशनात त्यांचा ज्येष्ठ सत्यशोधक म्हणून गौरव करण्यात आला.
दरम्यान, फुले समकालीन सत्यशोधक पंडित धोंडीराम नामदेव कुंभार यांच्या कार्यात आणि त्यांच्या ग्रंथ अध्ययनात त्यांना विशेष रस आहे.
गोवर्धने
पुंजाजी लक्ष्मण (जन्म ३-८-१८९०-मृयू ९-८-१९७१)
सत्यशोधक कर्मवीर कॉग्रेड पुंजाजी (पुंजाबाबा) लक्ष्मण पाटील गोवर्धन यांचा ३ ऑगस्ट १८९० रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या जन्म सांजेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. पुंजाबाबाचे शिक्षण जेमतेम इयत्ता
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




