सोलापूर

आज ६ एप्रिल. खरोखरच हा दिवस पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक शेतकरी. नागरिक व तमाम महाराष्ट्राबरोबर देशातील लाखो कुटुंबाचे आयुष्य प्रकाशमय करणारा दिवस आहे.

आज ६ एप्रिल. खरोखरच हा दिवस पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक शेतकरी. नागरिक व तमाम महाराष्ट्राबरोबर देशातील लाखो कुटुंबाचे आयुष्य प्रकाशमय करणारा दिवस आहे. कारण आजच्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल १९६४ रोजी म्हणजे ६१ वर्षापुर्वी आजच्या टाटा मोटर्स चे म्हणजे तत्कालीन टेल्को कंपनीचे भुमिपूजन स्वर्गीय सुमंत मुळगावकर साहेबांचे हस्ते संपन्न झाले. आणि त्या नंतर अनेक उद्योग या शहरात आले. लाखो कष्टकरी हातानां काम मिळाले. एखादा प्रकल्प उभा करताना अनेकांना विस्थापित व्हावे लागते.

नैसर्गिक संपत्तीची कत्तल करावी लागते. परंतु असे काहीच या ठिकाणी करावे लागले नाही. कारण या ठिकाणी ना मोठाले वृक्ष होते. ना नागरी वस्ती होती. होते फक्त ओसाड. निर्जन माळरान. खडकाळ व ओसाड माळावर लाखो लोकांच्या संसाराची स्वप्ने उमलली. फुलली. बहरली. स्थानिक शेतकऱ्यांच्या ओसाड माळावर मोठमोठाले प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे त्यांचेही भाग्य उजळले.

आज माझ्या सारख्या ग्रामीण भागातून व निसर्गावर अवलंबून असणाऱ्या अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील मुलाचे भाग्य उजळण्यास मदत करणारा हा दिवस आहे. योगायोग म्हणजे माझा जन्मदिवस ४ एप्रिल १९६० म्हणजे माझ्या वयाच्या ४ थ्या वर्षी टेल्कोचा प्रकल्प पुण्यात आला. आणि माझे सुद्धा भाग्य उज्वल करून गेला.

आज आपणास पिंपरी चिंचवड शहर आशिया खंडातील श्रीमंत शहर म्हणून नावारूपाला आले. खरोखरच याप्रसंगी महाराष्ट्राचे स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब. स्वर्गीय भारतरत्न जेआरडी टाटा साहेब व स्वर्गीय सुमंत मुळगावकर साहेबांच्या दूरदृष्टीचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. कारण गुजरातच्या एम आय डी सी मध्ये जाणारा प्रकल्प महाराष्ट्रात खेचून आणण्याचे काम व येथील लाखो तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या मुळे झाले. व त्या मुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली.

मी किवळ ता. कराड. जि. सातारा या गावात जन्माला आलो त्या गावातील सामाजिक बांधिलकीचे संस्कार व टाटांच्या संस्कृतीमध्ये काम केल्या मुळे त्याच्या सामाजिक बांधिलकीची शिकवण याचा मिलाप झाल्यामुळे मी सामाजिक कामाचा वसा व वारसा घेतला. व आयुष्यात सुखी झालो. धन्यवाद त्या माझ्या मातृभूमीला. व धन्यवाद त्या माझ्या टाटा संस्कृतीला. श्री. हणमंत किसन माळी (अध्यक्ष – महात्मा जोतिबा फुले ‘ मंडळ. पिंपरी चिंचवड)

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# टाटा ऊदाग कामगार पींपरी चिंचवड पुणे
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button