राजसत्तेत कशासाठी जायचे आहे?

राजसत्तेत कशासाठी जायचे आहे, ह्या गोष्टीचे खऱ्या अर्थाने जर आकलन झाले, तर सत्तेत जाण्यासाठी कुणी उत्सुक होणार नाही. आज सत्तेत जाणारे केवळ पद व पैसा इत्यादी गोष्टीं प्राप्त करण्याच्या उद्देशाने जातात. वास्तविकपाहता, हा चुकीचा विचार आहे. कारण सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असून जनतेचे जीवनमान कसे सुधारेल हे बघण्यासाठी सत्तेत जायचे आहे. सत्तेतील पदांकडे एक नोकरी किंवा धंदा म्हणून नव्हे, सत्ता ही स्वयंसेवा, विनामूल्य जनतेची सेवा करण्याचे एक माध्यम होय. एका आंतरराष्ट्रीय मंत्रीपरिषदेमध्ये एका देशाच्या मंत्र्याने भारतातील एका मंत्र्याला त्याच्या धंद्या विषयी विचारणा केली असता,
तो मंत्री म्हणाला की मी मंत्री आहे. त्या परदेशी मंत्र्याने पुन्हा विचारले की, आपका खुदका धंदा क्या है, त्यावर त्या मंत्र्याने पुन्हा तेच उत्तर दिले. त्या परदेशी मंत्र्याने सांगितले की, त्यांचा व्यवसाय शेती असून मंत्री हे त्यांचे सेवाभावी पद आहे. त्यातून मला पैसे कमवता येत नाही. आज सत्तेतील पदाला देशातील राजकारणी लोकांनी पैसा कमावण्याचा एक धंदा बनवला आहे. एवढेच नव्हे, तर सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याऐवजी जनतेवर एक अधिकार, एक रुबाब कसण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून जनतेला विशेषतः बहुजन समाजाला लाचार केले आहे.
महात्मा फुले यांनी समाजाचे ‘शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र’ असे दोन वर्ग निर्माण करून शूद्र अतिशूद्रांना संघटित करण्याचा केवळ संदेशच दिला नाही, तर त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून त्या कार्याची मुहूर्तमेढ केली. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी त्या कार्याचा पुढे देशभर विस्तार केला. त्यापूर्वी ब्राह्मण बनिया यांच्या हातातच सत्ता होती. त्या सत्तेचा उपयोग ते शूद्र अतिशूद्र (बहुजन समाज) वर्गाला गुलामीत ठेवण्यासाठी करत असत. परंतु इंग्रजांच्या राजवटी पासून सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी कसा केल्या जाऊ शकतो हे बघायला मिळाले.
परंतु इंग्रज गेल्यानंतर ब्राह्मण बनिया यांनी सत्तेचा उपयोग बहुजन समाजाला गुलाम बनविण्यासाठी केला. त्या कामी त्यांनी बहुजन समाजाच्या लोकांना सुद्धा आपल्या सोबत सत्तेत सामील करून घेत, त्यांना पदे देऊन, त्यांना गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आपल्याच बहुजन समाजाच्या लोकांवर हुकूमत गाजवायला शिकवले व सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी असते, हा विचारच रद्दबातल करून टाकला. त्यामुळे आज बहुजन समाजातील लोक सत्तेसाठी बेभान झाले असल्यास नवल वाटण्याचे काही कारण नाही. ते आज सत्तेसाठी एकमेकांचा जीव घ्यायला ही मागेपुढे पाहत नाहीत.
आज देशामध्ये एवढी संपत्ती आहे की, देशातील प्रत्येक कुटुंबाला अन्न वस्त्र व निवारा सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर जसे प्रधानमंत्री मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात मागे प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. ते अगदी बरोबर होते. कारण प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपये देण्याइतपत आपल्या देशाचे निव्वळ उत्पन्न आहे. परंतु ज्या ब्राह्मण बनिया यांच्या हातात देशाची खरी सत्ता आहे, तो वर्ग हा सर्व पैसा अनावश्यक असलेल्या सागरी रस्ता, महामार्ग, भुयारी मार्ग, मेट्रो साठी उंच सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बुलेट ट्रेन साठी मार्ग, धार्मिकस्थळांचे सुशोभीकरण, स्मारके इत्यादी अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च करून जनतेच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्यापासून जनतेला, विशेषतः बहुजन समाजाला ते वंचित ठेवत आहेत. बहुजन समाजामध्ये परस्परात द्वेष पसरवण्याचे, कलह निर्माण करण्याचे कार्य ही जाणीवपूर्वक केल्या जात आहे.
तेव्हा सत्ताही जनतेची सेवा करण्यासाठी असते, जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असते, जनता आनंदात कशी राहील, जनता स्वतंत्र विचार कशी केरल, जनतेमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी सत्ता असते. या गोष्टींची जनतेत जाणीव-जागृती निर्माण करावी लागेल. एकदा जनतेला सत्तेचा उद्देश माहित झाला, तर मग सत्तेत जाण्यासाठी अशी भाऊगर्दी होणार नाही. कारण पद व पैसा कमावण्याच्या उद्देशाने सत्तेत जाणाऱ्या लोकांवर जनतेचा एक अंकुश असेल. पैसा व पदाच्या लालसेने सत्तेत गेलेल्या लोकांना मग त्यांचा कान धरून सत्तेतून तात्काळ खाली खेचायला जनता मागे पुढे पाहणार नाही.
आज बहुजन समाज ब्राह्मण बनिया यांच्या राजकीय संस्कारामुळे आपल्या महापुरुषांचे, गुरु-संतांचे जीवन कार्य विसरले आहेत. त्यांनी केलेले कार्य मग ते सत्तेतून असो की सत्तेच्या बाहेर राहून असो, ती खरी जनसेवा होती. ज्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचा विवेक जागा झाला, ज्या माध्यमातून जनतेला योग्य व अयोग्य काय याची ओळख करण्याची दृष्टी प्राप्त झाली. त्यांच्या जीवनात आनंद प्राप्त झाला. म्हणून महापुरुष व संत-गुरु यांच्या विचारधारेतून संस्कारीत झालेली जनता (लोक) जर सत्तेत आली,
तर आपल्या देशातच नव्हे, तर पृथ्वीतलावर आनंदाचे साम्राज्य निर्माण होईल. आणि असे व्हायला आता, ज्या पद्धतीने देशात आज सामाजिक कार्याचे तुफान आले आहे ते बघता, जास्त काळ लागणार नाही.#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी


