शिक्षण ईशारा विशेषांकाची मा. छगनराव भुजबळ यांना भेट; महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक

📰
शिक्षण ईशारा विशेषांकाची मा. छगनराव भुजबळ यांना भेट; महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक
मुंबई : महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिल्ली येथे महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव गौरव वर्षा निमित्त आयोजित प्रथम विधुर विधवा अपंग घटस्फोटीत युवक-युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या “शिक्षण ईशारा” विशेषांकाची प्रत महाराष्ट्राचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांना त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानी भेट देऊन प्रदान केली.
या विशेषांकामध्ये छगनराव भुजबळ यांचा संदेश प्रकाशित करण्यात आला असून, समाजाने अशा प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद व समाजहिताचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी बुलढाणा येथील समाजसेवक रमेश हिरुळकर हेही उपस्थित होते.
महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम गेहलोत, वरिष्ठ उपाध्यक्ष रामलाल कच्छावा, रामनारायण चौहान, महासचिव आर. पी. सजनी तसेच कोषाध्यक्ष जी. एल. सैनी यांनी छगनराव भुजबळ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 ७३८७३७ 7801
👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा आणि अपडेट्स मिळवत रहा.
#हॅशटॅग्स :
#शिक्षणईशारा #छगनरावभुजबळ #महात्माफुले #सत्यशोधकशंकररावलिंगे #महात्माफुलेसामाजिकशिक्षणसंस्था #युवकयुवतीपरिचयसम्मेलन #समाजप्रबोधन #शिक्षणचळवळ #ओबीसीसमाज #दीनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #समाजहित #अभिमानास्पदकार्य #फुलेविचार #सामाजिकएकता




