महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.16

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.16
महात्मा फुले जडणघडण
जोतीरावांची चिंतनशीलता व बुद्धीकौशल्य पाहून त्यांच्या बागेशेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि मे. लिजिट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करण्याबद्दल त्यांच्या वडिलांपाशी आग्रह धरला. त्यांचे म्हणणे गोविंदरावांना पटले आणि इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलाला स्कॉटिश मिशनच्या शाळेत धाडले. इंग्रजी शिक्षणाचा प्रांरभ ही जोतीरावांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होय. यानंतर त्यांच्या जीवनक्रमाला वेगळे वळण लागले. लहानपणापासून गरीब कष्टकऱ्यांची हलाखीची स्थिती ते अगदी जवळून पाहात होते. आता ते समाजाच्या वरच्या थरातील लोकांत वावरू लागले. त्यामुळे आपल्या समाजातील भिन्न भिन्न जातींच्या व थरांच्या परस्परसंबंधांचे निरीक्षण करण्याची त्यांना आयतीच संधी मिळाली. शाळेत येणाऱ्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांपैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राम्हण विद्यार्थी त्यांचे जिवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली.
वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते. “सदसद्विवेकी सुबोधाचा दाता। गृहीणीचा पिता। जोती मित्र” अशा शब्दात त्यांनी या आपल्या मित्राचे गुणवर्णन केले आहे. केवळ कुटुंबपोषणाचीच चिंता करीत न बसता एकंदर समाजाच्या प्रगतीसाठी आपण जन्मभर एकदिलाने काही कार्य केले पाहिजे असे या मित्रमंडळाला सुरुवातीपासूनच वाटत होते. त्यासंबंधी त्यांच्यात वारंवार चर्चा होत असे. देशात काही विशेष घडले की, त्याचा त्यांच्या संस्कारक्षम मनावर परिणाम झाल्याखेरीज राहत नसे. पेशवाई नष्ट होऊन येथे ब्रिटिशांचे राज्य आले आणि स्थिरावले याचे आपल्या सर्वसामान्य जनतेला काहीच सोयरसुतक नव्हते.
मात्र या स्थित्यंतराची ज्यांना ताबडतोब झळ लागली होती, त्यांच्या मनात साहजिकच ब्रिटिश सरकारविषयी नाराजी होती. ज्यांचा राजाश्रय तुटला असे शास्त्री-पंडित व भिक्षुक-पुराणिक, ज्यांचा वंशपरंपरागत अधिकार व मानमरातब कमी झाला, ते पाटील-देशमुखादी वतनदार आणि ज्यांचा रोजगार बुडाला ते जुन्या आमदानीतील अंमलदार व शिपाईगडी हे सर्वच लोक असंतुष्ट होते. “इंग्रज सरकार या देशात आहेत याविषयी लोक उघड नाही, परंतु
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




