शरणगाथा क्रमशा.16

शरणगाथा क्रमशा.16
राज्ये एका मोठ्या दखनी संस्कृतीचा भाग आहेत. या चारही राज्यांचा इतिहास, भूगोल, भाषा, परंपरा, धर्म, अध्यात्म, खाणंपिणं आणि रोजचा व्यापार व्यवहारही एकम `कांत इतका गुंतलेला आहे की, तो एकमेकांपासून वेगळा करता येत नाही. आज आपल्याला वाटतो तो परकेपणा फार कृत्रिम आहे. स्वातंत्र्याच्या मागेपुढे झालेल्या काही घटनांमुळे या राज्यांत कटुता निर्माण झालीय. पण काळाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा विशाल पट बघितला तर हा परकेपणा भेदून टाकतील, अशी व्यापक संस्कृतीची पाळेमुळे या सगळ्या परिसरात घट्ट रुजलेली आहेत. त्यामुळे वादांच्या पलीकडचा संवादाचा धागा आजही तुटलेला नाहीच.
विशेषतः बौद्ध, जैन, नाथ, शैव, वैष्णव, सुफी, लिंगायत, महानुभाव, वारकरी, दासकूट, दत्त या प्राचीन विचार परंपरांनी ही दखनी भूमी कसली आहे. म्हणूनच आतापर्यंत सर्वात जुना मानला जाणारा मराठी शिलालेख शोधत गोमटेश्वराच्या भव्यदिव्य पुतळ्याच्या पायथ्याशी कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळला जावे लागते. तिथे गेल्यावर कळते की, हा मराठी शिलालेख तर कन्नड लिपीत लिहिलाय. हे एकीकडे तर दुसरीकडे आज माऊलींचा मराठी हरिपाठ कानडी लिपीत वाचणारे लाखो वारकरी आपल्याला पंढरपूरच्या वारीत भेटतात. फक्त पंढरपूरचा विठ्ठलच नाही, तर तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि खंडोबा, सौंदत्तीची यल्लम्मा, तिरुपतीचा बालाजी, माहूरची रेणुका, गुलबर्गाचा बंदेनवाज गेसू दराज दर्गा, गाणगापूरचे दत्त महाराज यांच्या दर्शनाला जाताना भक्तमंडळी काही राज्याच्या सीमा बघत नाहीत. म्हणूनच वारकरी ही फक्त महाराष्ट्राची परंपरा आहे आणि लिंगायत ही फक्त कर्नाटकाची परंपरा आहे, असे तुकडे पाडण्यात अर्थ नाही. ही या दख्खन परिसराची संयुक्त परंपरा आहे. चन्नवीर म्हणतो त्या प्रमाणे गोदावरी ते कावेरी खोऱ्यातील हा वारसा आहे.
म्हणूनच लिंगायत धर्माच्या स्थापनेची मुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या मंगळवेढ्याच्या कसदार मातीत रूजलेली सापडतात. मंगळवेढा भूमी संतांची आहेच. संत चोखामेळा, सोयराबाई, कान्होपात्रा, लतीफ शाह आणि दामाजींइतकीच ही भूमी बसवण्णांचीही आहे. राजा बिजळाच्या दरबारात नोकरी करताना बसवण्णांनी इथेच समतेचे पहिले प्रयोग केलेत. वयाच्या साधारण २६-२७ व्या वर्षी ते मंगळवेढ्याला आले. त्यानंतर जवळपास बावीस वर्षे इथे राहिले. अनुभव मंटपाची सुरुवातही इथलीच मानली जाते. इतकेच नाही तर
सिद्धरामय्या आणि रेवणसिद्धांसह बसवण्णांचे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01




