सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.109

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.109

केला असेल! तसेच सत्यशोधक तत्त्वज्ञानाच्या पायाभूत तत्त्वज्ञानावरही त्यांनी भाष्य केले असेल !

सत्यशोधक समाजाची १९११ ते १९३० पर्यंत राज्यात आणि कर्नाटक राज्यात एकंदर १३ अधिवेशने संपन्न झाली. यानंतर १९३०, १९४० आणि १९५० साली समाजाची तीस वर्षांत अवघी तीन अधिवेशने भरली. असे असले तरी प्रस्तुत तिन्ही अधिवेशनांचे संयोजक भास्करराव जाधव हेच होते. भास्करराव जाधव यांच्या हयातीतील समाजाचे सोळावे अधिवेशन ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ मे १९५० रोजी कोल्हापूर येथील पॅलेस थिएटरमध्ये पार पडले. या प्रसंगी भास्करराव जाधव ८३ व्या वर्षी अंथरुणाला खिळून होते. अशाही विपरीत परिस्थितीत त्यांचे ‘राम राम पाव्हणं’ हे भाषण त्यांचे एक पुत्र अप्पासाहेब जाधव यांनी वाचून दाखविले. या भाषणाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. या कडव्या सत्यशोधकाने आयुष्याच्या शेवटपर्यंत कोल्हापूर येथील शाहू कापड मिलचेच कापड वापरले. या कडव्या सत्यशोधकावर पुणे येथील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या ग. म. नलावडे यांनी प्रसंगी त्यांच्यावर एकांगी कडवट टीका केली. प्रस्तुत कडवट टीका जाधवरावांनी पचविली.

दलित बहुजन समाजाची समूळ सुधारणा व्हावी या उद्देशाने महात्मा फुले यांचा हा शागीर्द आयुष्यभर कार्यरत राहिला. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांना पक्षाघाताच्या आजाराने जर्जर केले. डोळ्याला काचबिंदू झाला. अशाही परिस्थितीत त्यांनी समाजाचे सोळावे अधिवेशन सफल केले. शेवटी दिनांक २६ जून १९५० रोजी हा बिनीचा सत्यशोधक कोल्हापूर मुक्कामी इहलोकाची यात्रा संपवता झाला. त्यांच्या निधनाने दुःखी होऊन ‘दीनमित्र’ पत्राने अत्यंत दुःखी अंतःकरणाने मृत्युलेख लिहून त्यांच्यात वसत असलेल्या अजातशत्रुत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले.

संदर्भ- १) सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ-१९३३-संपादक – माधवराव बागल, २) शाहू महाराजांची माणसे-कृ. भा. बाबर, ३) मराठा शिक्षण परिषदेचा इतिहास, १९४१-संपादक जयवंत जगताप, ४) सत्यशोधक समाज परिषद- अ.भा. व कार्यवृत्तांत, संपादक – प्राचार्य गजमल माळी, ५) सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका – संपादक- जयवंत गुजर, ६) दीनमित्र अंक – ५ जुलै १९५०

सत्यशोधकांचे अंतरंग / १८१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button