शरण गाथा क्रमशा.11

मुअपृष्टाविषयी
मुखपृष्टाविषयी
कोणत्याही ग्रंथाची वा कृतीची ओळख होण्यासाठी त्याच्या मुखपृष्ठाची भूमिका महत्वाची असते. मुखपृष्ठावरून लेखकाची भूमिका आणि आशय समजून घेण्यास मदत होते. ‘शरणगाथा – कल्याणपर्वातील निवडक शरणांच्या कथा’ या ग्रंथाचे आशयघन मुखपृष्ठ साकारले आहे सोलापुरातील आघाडीचे डिझायनर आणि ‘डिझाइन फॅक्टरी’ चे अमित रोडगे यांनी.
महात्मा बसवण्णा हे कल्याणपर्वाचे महानायक आहेत. लिंगायत धर्माचे केंद्रबिंदू असल्याने ते मध्यभागी आहेत. त्यांनी परिघावरील बिनचेहऱ्याच्या समाजाला चेहरा दिला. ओळख दिली. व्यवस्थेने मंदिरातील देवाचे दर्शन घेणेही नाकारलेल्या लोकांना बसवण्णांनी शरीररूपी मंदिर तर इष्टलिंगाच्या रूपात देव दिला. व्यवस्थेने लादलेले सर्व प्रकारचे भेद त्यांनी नाकारले. म्हणूनच परिघावर पुरूषांप्रमाणे स्त्रीयाही आहेत. स्त्री आणि पुरूष समप्रमाणातच आहेत. शीर्षभागावर दंपती जोडी आहे. त्यांच्यामध्ये केवळ केसांचा बुचडा हा एकमेव लिंगदर्शक फरक आहे. कपाळावर केवळ त्रीपुंड विभूती आणि गळ्यात इष्टलिंग असणे हे लिंगवंताचे बाह्य लक्षण आहे. शिवाय ही दृश्य लक्षणेही
१७ । शरणगाथा




